तृष्णा अजूनही अतृप्त

(725)
  • 435.7k
  • 141
  • 251.5k

सकाळच्या कोवळ्या किरणाने तिची खोली उजळून गेली होती. रोज ह्या कोवळ्या किरणांचा आस्वाद घेणारी ती मात्र आज गायब होती. तिला शोधण्याच्या नादात उन्हाचा एक कोवळा चुकार कवडसा उगाचच तिच्या मॉडर्न बाथरूमच्या नाजूक काचेतून डोकावला आणि क्षणभर तिथेच स्तब्ध झाला. अस बावनकशी भिजलेलं सौंदर्य जणू तो प्रथमच पाहत होता. पाण्याचे थंडगार ओघळ तिच्या मऊशार नितळ गोऱ्या कायेवरून व घाटदार वळणावरून तिच्या सर्वांगाचा वेध घेण्यासाठी घाईने धावत होते. सर्वच लहान मोठ्या थेंबांची तिच्या सर्वांगाला स्पर्श करण्याची चढाओढ चालू होती. पाण्याच्या थंडगार स्पर्शाने तीच अंग अंग रोमांचित होत होत. ती शीतलता सहन न होऊन घटकेला तीच अंग शहारत होत. तिच्या ओलसर फेसाळल्या केसातून

New Episodes : : Every Sunday

1

तृष्णा - अजूनही अतृप्त - भाग १

सकाळच्या कोवळ्या किरणाने तिची खोली उजळून गेली होती. रोज ह्या कोवळ्या किरणांचा आस्वाद घेणारी ती मात्र आज गायब होती. शोधण्याच्या नादात उन्हाचा एक कोवळा चुकार कवडसा उगाचच तिच्या मॉडर्न बाथरूमच्या नाजूक काचेतून डोकावला आणि क्षणभर तिथेच स्तब्ध झाला. अस बावनकशी भिजलेलं सौंदर्य जणू तो प्रथमच पाहत होता. पाण्याचे थंडगार ओघळ तिच्या मऊशार नितळ गोऱ्या कायेवरून व घाटदार वळणावरून तिच्या सर्वांगाचा वेध घेण्यासाठी घाईने धावत होते. सर्वच लहान मोठ्या थेंबांची तिच्या सर्वांगाला स्पर्श करण्याची चढाओढ चालू होती. पाण्याच्या थंडगार स्पर्शाने तीच अंग अंग रोमांचित होत होत. ती शीतलता सहन न होऊन घटकेला तीच अंग शहारत होत. तिच्या ओलसर फेसाळल्या केसातून ...Read More

2

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग २

" अरे जावईबापू कसं काय येणं केलत... ते ही सकाळी.." घाईने सोफ्यावरील पसारा आवरत तिच्या बाबांनी त्यांच्या जावयासाठी बसायला केली. तो... तिचा नवरा... अनय... सहा महिन्यांआधी तीच आणि अनयच लग्न झालं होत. नेहमी येताना अनय आणि ती एकत्रच यायचे. आज मात्र इतक्या सकाळी आणि घाईने आपल्या जावयाचं एकटच येणं त्यांना अपेक्षित नव्हतं. " बाबा.. बसा जरा बोलायचं होत.." त्याने बाबांचा हात पकडत त्यांना बळजबरी खाली बसवलं. त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव पाहून बाबाही काळजीत पडले. " काय झालं.. सगळ ठीक तर आहे ना.." बाबांनी काळजीने विचारलं. मात्र त्यातही त्यांना आपल्या स्वरातील व्याकुळता लपवता आली नाही. " नाही... " अनय थोड्या शांतपणे उद्गारला." काय झालंय.. ...Read More

3

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ३

ती बाल्कनीतून एकटक बाहेर पाहत होती. खाली गार्डनमध्ये खेळणारी मुलं तिला नेहमीच सुखावत. सर्व झुडूपांवर उमललेली फुल आणि दुडूदुडू खेळणारी मुल दोन्ही सारखीच. कधी कधी तीही त्यांच्यासोबत खेळायला जाई. त्याच्यात रमून जाताना आपला आयुष्यात काय चाललंय हे ती विसरून जाऊन पुन्हा लहान मूल होऊन जाई... काश माझं पण बाळ असेल अस.... नुसत्या कल्पनेनेच ती लाजली. तिच्या कानाच्या पाळ्या लालबुंद झाल्या. आपल्याच धुंदीत शरमुन तिने आपले डोळे बंद केले. तिला आपल्या डोळ्यांवर गरम श्वास जाणवले. लगोलग तिच्या माथ्याचे चुंबनही घेतले गेले. तिला आतून भरून आल. त्या ओल्या स्पर्शाने ती शहारली..... कसं कळत ह्याला माझ्या मनातलं... त्याच्या स्पर्श तिच्या अंगभर फिरत ...Read More

4

तृष्णा अजुनही अतृप्त - भाग ४

आताच प्रणयात न्हाऊन निघालेल अंग सावरत ती तिच्या मऊशार बेडवर विसावली. बाजुचीच मऊ गुलाबी फुलांची चादर तिने आपल्या देहाभोवती बराच वेळ झाला तो कुठेतरी निघून गेला होता.. आताशा तिला त्याला अजिबातच सोडवत नव्हतं. काय काय आणि कसं कसं सुख पेरत होता तो तिच्या आयुष्यात. तिच्या मऊ तांबूस सोनेरी कुरळ्या केसांना अजूनही त्याच्या स्पर्शाचा गंध येत होता. हलक्या नाजूक मोरपीसासारखी फिरणारी त्याची बोटं अजूनही तिच्या मानेवर रेंगाळत होती... नुसत्या त्याच्या स्पर्शाच्या आठवणीने ती रोमांचित झाली... त्याच्या खट्याळ आठवणीने ती स्वतःशीच हसली. हा माणूस असता तर.. हे असं लपून लपून भेटण्यापेक्षा किती मनमुराद जगलो असतो.. नाहीतर तो अनय... शी... बाबांना हाच ...Read More

5

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ५

" ये... बस इथे.." गुरुजींच्या आवाजाने त्यांची तन्द्री भंग झाली. चुपचाप आवाज न करता तो गुरुजींनी बोट दाखवलेल्या मृगजीनावर बसला. कोणी कोणाशी काहीच बोलत नव्हतं. एक प्रकारची शांतता पूर्ण वातावरणात भिनली होती. गुरुजींच्या अनुयायापैकी कोणीतरी त्याला एका मातीच्या वाडग्यात कसलस लाल रंगाचं द्रव्य आणून दिलं. ते पाहताच त्याला भुकेची आठवण झाली. कधीपासून तो भयंकर खडतर प्रवास करत इथे येऊन पोचला होता. तहान भुकेपलीकडे इथे येऊन पोचायची ओढ इतकी जबरदस्त होती की घरातून निघाल्यापासून साधं पाणीही त्याने प्यायल नव्हतं. " ओम.. ते द्रावण पिऊन टाक.." गुरुजींनी अत्यंत प्रेमळ स्वरात आज्ञा केली. त्यानेही क्षणाचा विचार न करता तो वाडगा तोंडाला लावला. खारट, तुरट, ...Read More

6

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ६

तरीही काहीजण परमेश्वर भक्तीची कास धरून लढा द्यायला उभे होते. मात्र करालच्या अमानुष महाभयंकर अत्याचारांसमोर कोणाचाच टिकाव लागला नाही. सगळं होत असताना एक व्यक्ती अखंड तपश्र्चर्येत लीन होती ती म्हणजे विश्वनाथशास्त्री. त्या भयंकर कोलाहलात स्वतःच्या मनाची शांती ढळू न देता भगवान शिवाची उपासना करणे हे एकच सत्य होत त्यांच्यासाठी. त्यांच्यावर प्रसन्न होऊन पुन्हा भगवंतांनी विश्वनाथशास्त्रीना आशीर्वाद दिला तो ह्याच भूमीवर. शत्रूचा नाश करायचा असेल तर आधी त्याचा मित्र व्हावं लागत ह्या उक्तीप्रमाणे विश्वनाथशास्त्रीही करालच्या समुदायात सामिल झाले. ह्या जगापासून अनभिज्ञ अशा कित्येक प्रकारच्या उपासना करालचे चेले करायचे. म्हणूनच आजवर कोणत्याच पुण्यात्म्याला करालला साधा स्पर्शही करणं जमलं नव्हत. तिथले प्रकार ...Read More

7

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ७

दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच सर्वत्र काळोख पसरला होता. वातावरण नेहमीपेक्षा जास्त कोंदट व कुबट झाले होते. पोट ढवळून टाकणारा आणि घ्यायला जमणार नाही इतका घाणेरडा वास सगळीकडे पसरला होता. वाराही अगदी जागीच गोठून गेला होता. ज्या प्राण्यांत थोडाफार जीव उरला होता ते अशुभाच्या जाणिवेने आक्रोशत होते. विश्वनाथशास्त्रींनी पहाटेपासून शिवाची आराधना चालू केली होती. भल्या पहाटे तिथून दूर असलेल्या नदीवर सचैल स्नान करून शिवलिंगावर अभिषेक करून आशीर्वाद घेतला होता. नेहमीसारखाच साधारण असा पोशाख परिधान करून ते बळी देण्याच्या मंडपाकडे निघाले.परंतु आज कपड्यांच्या आत संरक्षणासाठी रुद्राक्षाच्या माळा लपवल्या होत्या. खांद्याला भलीमोठी झोळी अडकवून आणि कपाळाला भस्ममिश्रित माती फासून सर्व तयारीनिशी त्यांनी बळीच्या मंडपात ...Read More

8

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ८

चंद्रग्रहण मध्यावर होत.. करालने समोरच्या यज्ञकुंडाभोवती चरबीचे दिवे पेटवले. बाजूच्या पात्रातील सफेद राखेने एक आकृती रेखाटली. त्या आकृतीच्या रेखा कुंकवाने भरून टाकल्या. चारीही बाजूला चार सफेद कवट्या व हाडांची रास रचली गेली. आपल्या डाव्या हाताच्या तळव्यावर खंजिराने वार करत त्याने स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला व मोठ्या आवाजात यक्षिणीला आवाहन करणं चालू केलं. त्याच्या तळव्यातून अखंड रक्ताची धार लागली होती पण मुखातून गगनभेदी मंत्रोच्चार चालू होते. चंद्रग्रहणाचा महत्त्वाचा प्रहर चालू झाला. इतक्या वर्षांची त्याची मनोकामना काहीच वेळात पूर्णत्वास जाणार होती. आणि अचानक कोंदट वाटणारा वारा जोरजोरात वाहू लागला. गढूळलेल्या वातावरणात अजुनच काळोख दाटला. वाऱ्याच्या फुंकरीने भडभडत जळणारे दिवे फरफर करत ...Read More

9

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ९

करालचा राग अनावर होत होता. एक सामान्य शूद्र मनुष्य आपल्याच गोटात राहून आपल्या विरोधात बंड पुकारतो हे त्याला सहन नाही व इतके दिवस त्याने मनाच्या तळाशी डांबून टाकलेला अहंकार उसळी मारून वर आला. त्याने रागाने छाती पिटत गळा फाडून गगनभेदी गर्जना केली. बाजूची मगाशी बळीच्या मानेवर चालवलेली तलवार उचलून त्याने सर्व शक्तिनिशी शास्त्रींच्या अंगावर फेकली. बंदिस्त असल्याने त्यांना काही हालचाल करणं जमत नव्हतं. करालने फेकलेल्या तलवारीने तडक त्यांच्या छातीचा वेध घेतला. रक्ताची एक चिळकांडी म्हातारीच्या जळणाऱ्या अंगावर उडाली. ती त्याही जळक्या अवस्थेत भीषण हसली. शास्त्री आपली शुद्ध हरपत जमिनीवर कोसळले. त्यांच्या हतबलतेवर हसत करालने आपले मंत्रोच्चार अजुन जोमाने चालू ...Read More

10

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १०

" परंतु तीच का... असे अजूनही लोक असतीलच ना ह्या जगात.. मी ही कधी ना कधी विरंगुळा म्हणून अशीच रंगवत बसतोच..." ओमने कधीपासून मनात ठसठसनारा प्रश्न विचारला. त्याच्या प्रश्नावर गुरुजी फिकटसे हसले. कदाचित हा प्रश्न त्यांना अपेक्षित असावा. व तितक्याच शांतपणे उत्तरले. " ती म्हणजे.. शशिकलाचा पुनर्जन्म आहे.. " " काहीही..." ओम इतक्या सगळ्या कथांवर विश्वास ठेवणारा नव्हता. " हे खरंय ओम... माहितेय तुझा विश्वास बसणार नाही... मरण आपल्या शरीराला असतं.. आत्म्याला नाही.... " गुरुजींना माहित होत ओम सहजासहजी विश्वास ठेवणाऱ्यातील नाही आहे. " माफ करा गुरुजी पण मी ही थिअरी मानत नाही." अत्यंत नम्र शब्दात तो उत्तरला. त्याला मनात मात्र आपल्या उत्तराने ...Read More

11

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ११

" मी.. नाही.. मी कसा काय..." अचानक सगळी जबाबदारी त्याच्यावर टाकली गेल्याने ओम गडबडून गेला." तूच सांग तू कसा आलास ह्या सगळ्यात.. आपली भेट.. त्यानंतर काहीतरी अभद्राची चाहूल लागण.... त्या भारलेल्या भागातून सहीसलामत येणं.. त्या काळोख्या वातावरणातून योग्य मार्ग शोधत इथे पोचणं.." गुरुजींना त्यालाच प्रश्न विचारले." मी...." त्याच्या मनातील प्रश्न गुरुजींनी त्याच्याच समोर मांडले होते. " तू... विश्वनाथ शास्त्रींचा वंशज आहेस... त्यासाठी तुला तुझ्या घराण्याचा सगळा इतिहास खोदून काढावा लागेल पण तितका वेळ नाहीये आता... मला सांग हे तुझ्या गळ्यातील लॉकेट कोणी दिलं तुला..?" " हे.. माझ्या वडिलांनी... आमच्या घराण्याची परंपरा आहे..." ओम बोलता बोलता विचारांत हरवला." हा तोच मंतरलेला खडा ...Read More

12

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १२

भुयार गुहेप्रमाणे बरच काळोखात व्यापल होत. हातात मशाल होती म्हणून ठीक.. परंतु ती छोटी मिणमिणती मशाल फक्त पावलाखालचा चिंचोळा दाखवत होती. पायाखालचे खाचखळगे चाचपडत व एका हाताने दगडी भिंतीना पकडत, धडपडत तो बाहेर निघाला. भुयार काही फारस मोठं नसावं... कारण भुयाराच्या तोंडाशी थोडीफार झुळुझुळू करणारी हवा सहज आत शिरत होती. त्या थंडगार स्पर्शाने त्याच्या डोळ्यावरची झोप उडाली. दोन पावलात भुयार संपूनही गेले. त्याने भुयाराच्या बाहेर पाऊल टाकले व जागीच स्तब्ध झाला. इतका सुंदर नजारा शहरात कधी कधीच नजरेस पडतो. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी अख्खा आसमंत व्यापून निघाला होतं. कोवळ्या पिवळट केशरी किरणांच्या प्रकाशात निळसर ढगानाही रंगीत झालर मिळाली होती. चारीबाजूने ...Read More

13

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १३

अनय मागच्या काही दिवसापासून अतिशय अस्वस्थ होता. मागच्या घटनेपासून सर्व काही माहित असतानाही न थकता गुरुजींच्या शोधात कित्येक गाव घालून आला होता. आपल्या लाडक्या बायकोची अशी दयनीय अवस्था त्याला पाहवत नव्हती. भलेही तिला प्रेम नको वाटू दे पण त्याच प्रेम तर होत ना. प्रेम ही नेहमीच काही मिळवण्याची गोष्ट नाही. पण जर जोडीदाराच्या चेहऱ्यावरच्या थोड्या आनंदाने जर तुमच्या तुटलेल्या काळजाच्या जखमा भरून निघत असतील तर... तिच्या आनंदापेक्षा दुसरे कोणते औषध नाही... अनयही असाच तिच्या चेहऱ्यावर हास्य ठेवण्यासाठी झटत होता. तिच्या अवस्थेला स्वतःला जबाबदार समजून आतल्या आत कुढत होता. त्यात तिच्या वडिलांची अवस्था बघून त्याला कीव येई. व आज सकाळी ...Read More

14

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १४

आपल्या मॉडर्न ड्रेसिंग टेबलवर स्वतःला न्याहाळत ती विचारांत गुंगून गेली होती. मागचे काही दिवस त्याच वागणं बदलल्यासारखं वाटत होत. तिच्याभोवती भिरभिरत असणारा तो तिच्यापासून दूर गेल्यासारखं वाटत होता. तिच्यासोबत प्रणयाच्या रंगात तासनतास रंगून जाणारा तो आता कुठे गायब होऊन जाऊ लागला. आताही जसा आला तसाच निघून गेला.. जणू कुठल्या रागात असावा...मी समोर असताना राग तरी कसा आठवतो त्याला... आणि आता शोधणार तरी कुठे त्याला... तिने आरशात स्वतःला पुन्हा पाहिलं. तिचे तांबूस सोनेरी केस विस्कटून कपाळभर पसरले होते. तिच्या मादक डोळ्यात त्याच्या विरहाची कळ ठसठसून दिसत होती. तिचे आरक्त गुलाबी गाल संतापाने अजुनच फुगले होते. तीच धारदार नाक किंचित थरथरत ...Read More

15

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १५

" घाई करायला हवी..." हातातील सामान पटापट पिशवीत भरत गुरुजी ओरडले. अनयच्या हाताला खेचत ओम त्याला त्याच्या घरी घेऊन होता. अचानक भेटणं, ओळख दाखवणं, हक्काने ओढत घरी घेऊन येणं.... अनयसाठी ओमच वागण अनपेक्षित असल तरीही त्याला ह्या क्षणी कशालाच विरोध करायचा नव्हता. ओमच्या घरी आल्यावर त्याला अजून एक धक्का बसला. तिथे गुरुजी व तिचे बाबा आधीच उपस्थित होते. जराही वेळ न दडवता जुजबी ओळख करून घेऊन ओम व गुरुजींनी मिळून त्याला सगळ काही थोडक्यात समजावलं. शेकडो वर्षांआधी घडल्या गोष्टींचे असे काही पडसाद उमटले जाऊ शकतात ह्याची त्या बिचाऱ्याला काही कल्पना नव्हती... जगात ह्या ही गोष्टी असतात....त्याची बुध्दी ह्या सगळ्यावर ...Read More

16

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १६

ते सर्वजण अनयच्या घरासमोर येऊन उभे होते. आधीच त्या आवारात बाहेरच्या भागाच्या मानाने कडाक्याची थंडी जाणवत होती. तेवढ्या आवारातील कोंडल्यामुळे कोंदट बनली होती. बाहेरच्या हवेला आत यायला त्या शक्तीने मज्जाव टाकला होता. मलूल होऊन जमिनीवर पडलेली बागेतील झाड आपलं लुळ अंग सावरत म्लान नजरेने त्यांना आत न जाण्याचा इशारा करत होती. तिथलं एकंदर वातावरण पाहूनच अंगावर शिसारी येत होती. पण घराची अवस्था पाहून सर्वांच्याच हृदयात धडकी भरली. घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून सफेद धुराचे लोटच लोट निघत होते... जणू काही घरात आग लागली होती... घरावर हिरव्या काळसर ढगांचा एक जाडजूड थर घरावर कोसळण्याच्या तयारीत होता आणि तो धूर हवेत विरून जायच्या ...Read More

17

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १७

तो... दरवाजातून आत गेला म्हणजे..... ओम खडबडून जागा झाला. शरीर जरी गोठून गेलं असलं तरी त्याचा मेंदू अजुन विचार स्थितीत होता. खूप कष्टाने आपल्या डोळ्यांची उघडझाप करत तो नीट पहायचा प्रयत्न करत होता. परंतु त्याच्याभोवती वेढलेल्या धुक्यातून त्याला काही स्पष्ट दिसेना... आपल्या दुबळ्या पडलेल्या शरीराला जोर देत त्याने थोडी हालचाल करायचा प्रयत्न केला परंतु धुक्याच्या दोरखंडाने त्याला पक्क जखडून ठेवल होत.... नक्कीच अनय त्याच्यावर सोपवलेल्या कामगिरीत अपयशी ठरला... ओमचा योजनेप्रमाणे त्याने अनयला तिथे पोचल्यावर एक महत्त्वाची कामगिरी सोपवली होती. ते व आजूबाजूचा पूर्ण परिसर त्या शक्तींच्या अधिपत्याखाली असणार होता. घरात सर्व वाईट शक्तींचं वास्तव्य असल्याने कोणालाच आत प्रवेश करणं शक्य ...Read More

18

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १८

आणि तो स्वतः ....स्वतः.. गंगेच्या काठावर पोचला होता... भगवान शंकरांनी दिलेल्या दृष्टांताप्रमाणे त्याच्या हातात काही चमकदार दगड होते... त्यातील दगडाचे मंत्रोच्चार करताच आपोआप सात खड्यांत रूपांतर झाले... त्यात खुद्द भगवान शंकरांनी दैवी ऊर्जेचे स्त्रोत निद्रिस्त अवस्थेत बांधून ठेवले होते... भगवान शंकरांच्या वरदानानुसार जेव्हा ह्या सृष्टीला मदतीची गरज असेल तेव्हा हे सातही खडे एकत्र येऊन त्यातील सुप्त ऊर्जा जागवल्यावर येणाऱ्या संकटापासून वाचविण्यासाठी सहकार्य करतील... सहा खडे तर होते.. मात्र त्यातील एक कुठेतरी हरवला होता... एक खडा तर तिला दिला होता... त्या झाडाखाली... आपली योजना समजावून सांगताना.. आणि त्यावर तिने केलेलं उदासवाण फिकट हास्य... ह्या जन्मातही त्याला जसच्या तस आठवत होत.. ...Read More

19

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १९

आयसीयू वॉर्डमध्ये ती निपचित पडून होती. तीच्या निस्तेज पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्यावर तिने काय काय भोगलं असेल हे समजून येत बाजूलाच लटकवलेली वेगवेगळ्या प्रकारची बरीच सलाईन तिला जागवण्यासाठी निमुटपणे तिच्या शिरांतून वाहत होती. बाजूच्या मशीनवर वरखाली होत जाणारी रेषा तिच्या जिवंत असण्याचा दिलासा देत होती. कित्येक तासांपासून अजुनही तिला शुद्ध आली नव्हती. बाहेर गुरुजी, बाबा आणि ओम मलमपट्टी केलेल्या अवस्थेत तिच्या रूमच्या दिशेने पाहत होते. " अनयचे नातेवाईक...?" ऑपरेशन वॉर्डमधून बाहेर येत डॉक्टरांनी विचारणा केली." आम्ही..." गुरुजी, बाबा व ओम एकसाथ ओरडले. " घाबरु नका.... छोटंसं ऑपरेशन होत... तासाभरात शुद्धीवर येईल पेशंट...आणि दोन दिवसांत बरा पण होईल... " बाकीची प्राथमिक चर्चा करून ...Read More

20

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग २०

ती पूर्णपणे त्या शक्तीच्या कह्यात होती. ओमच्या सुचनेप्रमाणे अनय भराभर राखेने रिंगण रेखाटत खिडकीजवळ पोचला होता. आत काय चाललंय डोकावून पाहण्यासाठी त्याने सहजच खिडकीची काच ढकलली. आत कसल्याशा हवनाची तयारी मांडलेली होती. एक भलामोठा यज्ञ ढणढणत जळत होता. बाजूलाच एका शैयेवर ती नखशिखांत सजून त्याच्या प्रतीक्षेत उभी होती. त्याच्या प्रेमात चिरविहिरणी होऊन त्याच्या प्रणयात न्हाऊन जाण्यासाठी ती उतावीळ होती. तिचे हे भाव तिच्या नटलेल्या सलज्ज चेहऱ्यावर अनयपासून लपून नाही राहू शकले. एक पती म्हणून त्याच्या आत द्वेषाची आग उफाळून आली मात्र त्याच सोबत मनात तिची काळजीही होती. कदाचित जर त्यांचा प्रणय ही शेवटची पायरी असेल तर तिचा वापर झाल्यावर ...Read More

21

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग २१

पहाटेचे साधारण तीन वाजले असावे. हॉस्पिटलच्या आत बाहेर एकदम शांतता पसरली होती. रुग्णांच्या नातेवाइकांना रात्री आत प्रवेश नसल्याने सगळ्याच मुख्य दरवाजा बंद होता. दिवसभर माणसांनी गजबजून गेलेले वॉर्डस चिडीचूप पडले होते. वॉर्डबॉईजही सगळ टेंशन झटकून कधीचेचं झोपी गेले होते. पॅसेजमध्ये अगदी नावाला मंद दिवे जळत होते. अंधुकश्या प्रकाशापेक्षा काळोखच जास्त भरून राहिलेला. त्या काळोखात एक सावली हळूच भिंतीच्या आधाराने खुरडत सरकत होती. पावलांचा आवाजही न करता ती सावली तिच्या रुमच्या दिशेने वळली. रात्रीच्या अंधारात दरवाजा जरा कुरकुरलाच. त्या आकृतीने वळून इथला तिथला कानोसा घेतला. दरवाज्याच्या आवाजाने कोणाचीच झोप तुटली नव्हती. त्या आकृतीने हलकेच सुटकेचा निःश्वास सोडला. उघड्या दारातून ती ...Read More

22

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग २२

काही करून तिला रोखायला हवं. त्याला हातातील मंतरलेल्या राखेची आठवण झाली.क्षणासाठी आपला श्वास रोखून तो सावध होत पवित्रा घेतला. जवळ यायच्या आत त्याने पोतडीतील मुठभर राख तिच्या दिशेने उधळली. राखेचा स्पर्श होताच ती जागीच थबकली. तिच्या सर्वांगाला वेदना होऊ लागल्या. असह्य वेदनेने की ओरडू लागली. तिला अनयवर हल्ला करायचा होता मात्र एकच जागी खिळली गेल्यामुळे ती काहीच करू शकत नव्हती. हळू हळू तिच्यावर भारी असलेला करालचा प्रभाव क्षीण होत होता मात्र तिच्या चेहऱ्यावरचे रागीट भाव किंबहुना वेदनेमुळे अजुन तीव्र झाले होते. तिला क्षणाचीही उसंत न देता त्याने लगबगीने तिच्याभोवती राखेच रिंगण रेखाटलं. हवेत राखेची धूळ अजुनही असल्याने ती फक्त ...Read More