Trushna ajunahi atrupt - 13 in Marathi Horror Stories by Vrushali books and stories PDF | तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १३

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १३

अनय मागच्या काही दिवसापासून अतिशय अस्वस्थ होता. मागच्या घटनेपासून सर्व काही माहित असतानाही न थकता गुरुजींच्या शोधात कित्येक गाव पालथी घालून आला होता. आपल्या लाडक्या बायकोची अशी दयनीय अवस्था त्याला पाहवत नव्हती. भलेही तिला प्रेम नको वाटू दे पण त्याच प्रेम तर होत ना. प्रेम ही नेहमीच काही मिळवण्याची गोष्ट नाही. पण जर जोडीदाराच्या चेहऱ्यावरच्या थोड्या आनंदाने जर तुमच्या तुटलेल्या काळजाच्या जखमा भरून निघत असतील तर... तिच्या आनंदापेक्षा दुसरे कोणते औषध नाही... अनयही असाच तिच्या चेहऱ्यावर हास्य ठेवण्यासाठी झटत होता. तिच्या अवस्थेला स्वतःला जबाबदार समजून आतल्या आत कुढत होता. त्यात तिच्या वडिलांची अवस्था बघून त्याला कीव येई. व आज सकाळी तर त्यांनी काही नवीनच खुलासा केला होता की तिच्या लहानपणी ते तिला घेऊन एका मंदिरात गेले होते. त्यावेळी तिथल्या पुजाऱ्याने तिला पाहून ती भविष्यकाळात एका कठीण प्रसंगात सापडेल व पुढे घडणाऱ्या सर्व घटनांना ती जबाबदार असेल असं भविष्य वर्तवल होत. मात्र ही केवळ अंधश्रद्धा आहे असं समजून तिच्या वडिलांनी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. ते पुजारी काहीतरी उपाय सांगत होते की त्यांना अद्वातद्वा बोलून तिचे बाबा काहीही न ऐकता तिथून निघून गेले होते. आधी अंधश्रध्दा समजणारे तिचे बाबा मोठेपणी जस तीच वागणं बदललं तसे आपली चूक समजत गेले. आपल्या हातून घडलेली चूक उमजली मात्र वेळ निघून गेली होती.

विचार करून करून त्याच डोकं फुटायची वेळ आली होती. कपाळावरची शिर रागाने ताडताड उडत होती. सगळा संताप आणि हतबलता त्याच्या डोळ्यात उतरली होती. ह्या क्षणी हाताच्या मुठी घट्ट आवळून भिंतीवर प्रहार करण्यापलीकडे त्याला काहीच शक्य नव्हतं. एखादा माणूस असता तर त्याला जिवंत जाळलं असत पण हे जे काही होत ते विचित्र होत. पहिल्यांदा कधीतरीच येणार ' ते ' आता चारी ठाव त्याच्या घरात ठाण मांडून बसल होत. जखमी वाघासारख चवताळून समोर येईल त्याच्यावर झडप घालत होत. प्रचंड संतापाने फुत्कारत मांडलेला पट उधळून लावावा तशी पूर्ण घरात त्याने उलथापालथ माजवली होती. अनयला तर जणू स्वतःच्या घराच्या आसपास भटकण्यास मज्जाव होता. अनय घराच्या उंबरठ्यावर जरी गेला तरी ते गुरकावून उधळत त्याला मारायला त्याच्या अंगावर येई.

जे केवळ ढगाच्या पांढऱ्या पुंजक्यासारखं दिसत, ज्याला कशाचा आकार नाही, जे अमानवी आहे, ज्याच्या अस्तित्वाबद्दल काही माहित नाही.... त्याला मारायचं तरी कशाने... कितीवेळा अनय हिम्मत करून दार ओलांडून आत गेला मात्र त्याच्यावर चारी बाजूने हल्ला होऊन कस्पटासारखा घराबाहेर फेकला गेला. अनयला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईपर्यंत त्याने अनयवर हल्ला चढविलेला असे. आपल्या बायकोच्या प्रेमाखातर जीवही द्यायला तयार असलेला तो वीर एकाच फटक्यात घायाळ होऊन मागे परते..... तो कसातरी वाचून पळे...पण तीच काय..? ती तर घराच्या आतच होती... तीच काय झालं काय नाही कोणालाच पत्ता नव्हता... समजावं तरी कसं...?

आताही अनय घराबाहेर उभ राहून घराचं निरीक्षण करत होता. बंगल्यावर काळया ढगांनी गर्दी केली होती. त्यांना भेदून सूर्यकिरणेही आत यायची हिम्मत करत नव्हती. बंगल्याभोवतालची झाडं उभ्या उभ्या कोमेजून गेली होती. काही दिवसांपूर्वी हिरवीगार डोलणारी त्याची बाग वणव्यात होरपळून गेल्यासारखी निस्तेज मान टाकून पडली होती. कालपर्यंत त्याच्या बंगल्याची येता जाता तारीफ करणारा प्रत्येकजण आज ढुंकूनही त्या बंगल्याकडे पाहत नव्हता.

" अनय " विचारांत हरवलेल्या अनयच्या कानांवर अपरिचित आवाज पडला. त्याने थोड्या आश्चर्याने वळून पाहील. त्याच्या मागे साधारण सव्वीस - सत्तावीस वर्षाचा एक उंचपुरा तरुण त्याच्याकडे पाहत स्मितहास्य करत होता... अनयला त्याला आधी कधी पाहिल्याच आठवत नव्हतं...नक्की हा आपल्यालाच बोलावत असावा ना... त्याच्या डोळ्यात तसेच अनोळखी भाव तरंगत होते.

" अनय..." त्या तरुणाने पुन्हा आवाज दिला. ह्यावेळी मात्र अनयची तंद्री भंग पावली.

" अं... मी..." खात्री करण्यासाठी त्याने विचारलंच.

" हो.. तुम्हीच..." तो तरुण चेहऱ्यावरच हास्य रुंदावत उत्तरला.

" आपण...." अनयला अजूनही तो कोण आहे ह्याच कोडंच होत.

" ओह सॉरी.... ओळख राहिली.." अनयच्या प्रश्नार्थक नजरेेच रहस्य त्या तरुणाला उलगडल. " मी ओम.." गालात हसत त्याने अभिवादनासाठी उजवा हात पुढे केला.

अनय अजूनही संभ्रमात होता. त्याच अभिवादन स्विकारण्याच भानही त्याला नव्हतं. आयुष्यात असे काही होत होत की आजूबाजूलाही जग आहे हे त्याच्या ध्यानात नव्हतं.

" अनय..." ओमने त्याला जाग करायला पुन्हा त्याला हाक मारली.

" अं.... " अनयला काय होतंय तेच समजत नव्हतं. तिच्या काळजीने तो इतका हवालदिल झाला होता की त्याचं कोणाकडे लक्षच नव्हतं.

" मी तुझ्याशी बोलतोय अनय..." ओम जरा मोठ्यानेच बोलला. त्यालाही अनयची परिस्थिती समजत होती. परंतु त्याने असे हात पाय गाळले तर संकटाला सामना कोण करणार...

" सॉरी.. ते.." अनय उगाच सारवा सारव करायचा प्रयत्न करू लागला.

" मला माहितेय तू कशाच्या विचारात आहेस... त्यासाठीच आलोय मी..." गुरुजींच्या आज्ञेवरून तिचा शोध घेत ओम पुन्हा शहरात आला होता.

नुसत्या ओमच्या आश्वासक स्पर्शाने अनयला धीर वाटला. आपल्या मनातील तळमळ आपण कोणालातरी बोलून दाखवू शकतो ह्या नुसत्या विचाराने त्याला बर वाटलं. काळजीने निस्तेज झालेल्या त्याच्या डोळ्यात थोडी का होईना आशेची चमक आली.

" ओम हे सगळं..." अनयला स्वतःलाच नक्की काय ते माहित नव्हतं पण त्याला सगळ काही ओमला सांगायचं होत.

" सगळ सांगतो मी तुला...पण इथे नको.." ओम त्याच बोलणं तोडत उत्तरला. " इथे नाही.." अनयच्या हाताला पकडुन खेचतच ओम त्या परिसरातून पळत निघाला. अनयच्या मनात बरेच प्रश्न होते आणि ओमजवळ त्या सर्वांची उत्तर. मात्र हे सगळं त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या ठिकाणी ते बोलू शकत नव्हते. ओमसाठी अनयची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची होती. म्हणूनच तो नेहमीपेक्षा जास्तच वेगाने चालत होता. कदाचित त्याला माहित नव्हतं पण त्या आतल्या शक्तीला ओमच्या मनसुब्यांची भणक लागली होती. जर त्यांनी मागे वळून पाहिलं असतं तर घरातून निघणाऱ्या धुरांचे लोळ बघून त्यांना समजलं असतं की त्या शक्तीने घरात काय थैमान घातले होते.