Trushna ajunahi atrupt - 19 in Marathi Horror Stories by Vrushali books and stories PDF | तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १९

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १९

आयसीयू वॉर्डमध्ये ती निपचित पडून होती. तीच्या निस्तेज पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्यावर तिने काय काय भोगलं असेल हे समजून येत होत. बाजूलाच लटकवलेली वेगवेगळ्या प्रकारची बरीच सलाईन तिला जागवण्यासाठी निमुटपणे तिच्या शिरांतून वाहत होती. बाजूच्या मशीनवर वरखाली होत जाणारी रेषा तिच्या जिवंत असण्याचा दिलासा देत होती. कित्येक तासांपासून अजुनही तिला शुद्ध आली नव्हती. बाहेर गुरुजी, बाबा आणि ओम मलमपट्टी केलेल्या अवस्थेत तिच्या रूमच्या दिशेने पाहत होते.

" अनयचे नातेवाईक...?" ऑपरेशन वॉर्डमधून बाहेर येत डॉक्टरांनी विचारणा केली.

" आम्ही..." गुरुजी, बाबा व ओम एकसाथ ओरडले.

" घाबरु नका.... छोटंसं ऑपरेशन होत... तासाभरात शुद्धीवर येईल पेशंट...आणि दोन दिवसांत बरा पण होईल... " बाकीची प्राथमिक चर्चा करून डॉक्टर आपल्या केबिनच्या दिशेने निघून गेले.

बंगल्याच्या मागच्या बाजूला त्यांना अनय जखमी अवस्थेत आढळून आला होता. अंगभर बर्फाचा थर जमा होऊन तो जवळपास त्यात गोठून गेला होता. आणि छातीपासून पोटावर रक्ताचे ओघळ पसरले होते. तातडीने त्याला व तिला गाडीत टाकून ते हॉस्पिटलला घेऊन आले होते. आल्यापासून सर्वांचाच अगणित प्रश्नांचा भडीमार त्या तिघांवरही होत होता मात्र इतक्या लढ्यानंतर तिघेही शारीरिक व मानसिकदृष्ट्या अत्यंत थकून गेले होते. शेवटी ताण सहन न होऊन तिघेही जाग्यावरच कोसळले. इथे दोघेही हे नवरा व बायको दोन वेगवेगळ्या वॉर्डमध्ये मृत्यूच्या छायेत जीवनाची झुंज देत होते.

-----------------------------------------------------------------------

" तू.... पुन्हा आलास...?" दरवाजातून थयथयाट करत आपली जळजळीत नजर रोखत कराल विचारत होता.

एव्हाना बराचसा सावरलेल्या ओमने त्याच्या लालभडक डोळ्यांत आपले डोळे घालून रोखून पाहिलं. त्याच्या रक्तवर्णी डोळ्यांत साऱ्या ब्रह्मांडाची क्रूरता उतरलेली होती. त्याच्या अंगार फुलल्या डोळ्यांवरून व थयथयाटावरून ओम जे समजायचं ते समजून गेला. करालची पूजा भंग झाली होती व सोबतच सगळे मनसुबे जळून राख झाले होते.....

ओमने करालच्या नजरेतून नजर न हटवता एक मोठा श्वास घेतला. ओमची हिम्मत पाहून क्षणभर कराल बावरला. हा त्रिखंडात एकमेव प्राणी होता ज्याने करालशी नजर भिडवण्याची हिम्मत केली होती. आणि त्याच्या त्या हिमतीला करालच्या राज्यात माफी नव्हती. आपले दोन्ही हात आपल्या महाकाय खडबडीत छातीवर आपटत त्याने पुन्हा किंचाळत आक्रोश करायला सुरुवात केली. ओमने केलेल्या मंत्रचमत्काराने कराल व चांद्रहासच्या शक्ती शिथिल पडत चालल्या होत्या. आणि भरीस भर म्हणून चंद्रग्रहण संपायच्या टप्प्यात येऊन पोचले होते. इतका वेळ कोणाच्याही नजरेस न पडलेलं चंद्राचं एक काहीस धीट किरण सावकाश आपले हात पाय पसरत होत. आकाशाकडे नजर जाताच कराल अजुनच बिथरला. ज्या सृष्टीवर कब्जा करून त्याने मितीची गती थांबवून ठेवली होती तेच सृष्टीचक्र त्याला न जुमानता पुन्हा त्याच्याच वेगाने फिरू लागले होते. हे सगळं फक्त आणि फक्त समोर जखमी अवस्थेत पडलेल्या दोन माणसांमुळे होत होत...पूजा तर भंग झालीच होती आणि त्यांना थांबवलं नाही तर त्यांना पुन्हा आपल्या मितीत परतून जावं लागणार होत आणि पुन्हा वाट पहावी लागणार होती अशाच एखाद्या खास चंद्रग्रहणाची... जे शेकडो वर्षांत कधीतरी एकदा येईल... त्याच्या डोळ्यांसमोर त्याने वाट पहात घालवलेली शेकडो वर्ष कोलांट्या मारू लागली. पूजेच्या ऐन टप्प्यात त्याचा काम उफाळून आल्याने झालेला घात जशाचा तसा त्याच्या नजरेसमोर तरळत होता.. त्यामुळे त्याच्या सर्व शक्तींचा झालेला ऱ्हास... कमजोर पडताच त्याच्याच गुलाम शक्तींनी त्याच्यावर चढविलेला हल्ला... त्यात त्याचा झालेला मृत्यू... मृत्यूच्या वेळी कडाडून घेतलेली पुन्हा परतायची शपथ... स्वर्ग ना मार्ग मिळता दीनवाणा भटकत राहिलेला त्याचा आत्मा... उपद्रव नको म्हणून त्या सर्वांची दुसऱ्या मितीत केलेली पाठवणी.... पसंत नसतानाही केवळ सर्व शक्ती मिळविण्यासाठी धारण करावा लागलेला हा ओंगळवाणा देह आणि शक्तिमान बनण्यासाठी केलेली कट्टर तपश्चर्या.... सर्व काही आता घडल्यासारख त्याच्यासमोर उभ होत. इतकी वर्ष तडफडणाऱ्या त्याच्या जीवाला आज मोका मिळताच त्यात तडमडणाऱ्या ओमला थांबवण्यासाठी त्याच्या शक्ती तर नाकाम होत्या त्यामुळे त्याला शारीरिक बलाचा वापर करण्याशिवाय पर्याय नव्हता. चांद्रहासच शरीरचं नसल्याने व ह्याक्षणी त्याची कोणतीही शक्ती काम करत नसल्याने केवळ कराललाच मैदानात उतराव लागणार होत.

गडगडाटी हसत त्याने आपले दात विचकले. त्यातून हिरवे पिवळे दिसणारे त्याचे दात लखकन चमकले. त्या चमकण्यातही एखाद्या बिजलीच्या लखाखण्याचा भास होता. ओमला विचारही करायला वेळ न देता त्याने एकाच उडीत ओमवर झेप घेतली. काहीतरी होतय हे समजेपर्यंत करालची लाथ ओमच्या मानेवर पडली होती. लाथेच्या धक्क्याने तो उडून दोन फूट अंतरावर जाऊन धाडकन आपटला. लाथेच्या प्रहाराने व आपटल्याने त्याच सर्वांग चांगलच मोडून निघालं होत. सर्वांगातून वेदनेच्या कळा लहरत होत्या. आपले मिटणारे डोळे अर्धवट उघडत भानावर येण्याचा प्रयत्न करत असतानाच अजुन एक घाव त्याच्या डोक्यात पडला. त्या घावाने त्याच मस्तक भनाणून उठल. पुढील दणका सहन करण्यासाठी त्याच्या शरीरात नावालाही जीव उरला नव्हता. करालच्या पुढच्या प्रहारात त्याची हार होती... फक्त हार... सुडाच्या भावनेने पेटलेल्या करालला ओमच्या मृत्यूशिवाय दुसरे काहीच सुचत नव्हते. आपल्या हिरव्यागार हाताच्या मुठी घट्ट आवळून त्याने ओमच्या दिशेने धाव घेतली. ओमच्या समोर तर साक्षात मृत्यू त्याच्या दिशेने धावत येत होता. त्याच्या अर्धवट मिटल्या पापण्यांना करालच अवाढव्य धुड धावत येताना दिसत होत. जमिनीवर आपटल्याने कपाळावर पडलेल्या जखमांमधून रक्त पाझरत त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर पसरलं होत. सर्वांग बेजार झालेलं, ओल्या जखमा व मुकामाराने बेजार होऊन त्याला बचावासाठी बाजूला होण्याची ताकद नव्हती. रक्ताळलेल्या डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याने हळूच अवकाशात पाहिलं... अगदी काही सेकंद बाकी होते....मग सर्वच संपणार होत... हे जगणं... हा जीव... ही लढाई... आणि कदाचित ही पृथ्वीसुद्धा आपल्या दुखऱ्या हाताच्या मुठी कशाबशा आवळत व आपली अर्धवट तुटकी मान सावरत तो तयार होता.... बलिदानासाठी...

कराल काय करणार ते जाणवून ही सृष्टीसुद्धा गर्भगळीत झाली. झाडे फांद्या घासत तडफडू लागली. पक्षांनी व प्राण्यांनी घाबरून कर्कश्य ओरडायला सुरुवात केली. शांत झालेला वारा भीतीने सैरावैरा पळू लागला. आभाळातून हे युद्ध पाहायला गर्दी केलेल्या ढगांनी घाबरून आपले डोळे मिटून घेतले. एक वीज लखकन कडकडून खाली कोसळली.... आणि... करालने सर्व शक्तिनिशी ओमच्या अंगावर झेप घेतली. काही कळायच्या आतच एक मोठा काळीज फाडून टाकणारा स्फोटासारखा आवाज आला. सर्व काही संपलं ह्या जाणिवेने अख्खी सृष्टी स्तब्ध झाली.... आणि... करालच्या शरीराने पेट घेतला. तेवढ्याशा क्षणात काहीतरी घडल होत. त्या पेटलेल्या शरीराआडून स्फटीकाचा खडा अजुन तेजाने तळपत होता. त्या तेजाची तीव्रता वाढत जाऊन त्याने पूर्ण आसमंत व्यापून टाकला. ओमचा रक्ताने भिजलेला चेहरा त्या खड्याच्या तेजाने उजळून निघाला होता...त्याच्या चेहऱ्यावर एका विलक्षण समाधान पसरलं होत.... सुजलेल्या डोळ्यांतून नकळत एक आसू लवंडला... ओमची नजर पुन्हा आभाळात वळली. चंद्रग्रहण नुकतंच संपत होत....

-----------------------------------------------------------------------

तिने थोडीफार फडफड करत डोळे उघडले. डोळे उघडताक्षणी अंधुक नजरेला अनपेक्षितपणे पांढऱ्या भिंती व हिरव्या पडद्याच्या आड बसलेले तिचे बाबा व गुरुजी दिसले. सर्वांगाला ठीकठिकाणी बँडेज गुंडाळल्या अवस्थेत त्यांना पाहून ती खजील झाली. आधीच फिकट पडल्या तिच्या गालांवर अजुन पिवळट छटा पसरली. काही गोष्टी तिला आठवत होत्या.. पण... काहीतरी हरवल्याची जाणिव होती. नक्की काय घडतंय ते समजत नव्हतं पण अचानक भीतीने पोटात गोळा येऊ लागला.

" माफ करा मला.." तिच्या डोळ्यांतून मागच्या काही महिन्यांतील घटना पश्चात्ताप बनून अश्रूंवाटे वाहत होत्या. " मी चुकली.. खूप चुकली.." तिला हात जोडून माफी मागायची होती परंतु सलाईनच्या विळख्यात तिचे हात जखडले होते. तिच्या मलूल झालेल्या हातात माफी मागायचेही त्राण उरले नव्हते.

" झाल बेटा.... संपलं ते..विसरून जा ते.." हळुवार शब्दात बाबा तिला उत्तरले. खरतर त्यांना तिला खूप काही समजावयाच होत परंतु ही वेळ योग्य नव्हती. नियतीने तिच्यासमोर अजुन एक परीक्षा मांडून ठेवली होती. आणि त्याच चिंतेत बाबा व गुरुजी विचार करत होते. त्यांच्या मनातल्या विचारांचं द्वंद्व त्यांच्या आठ्या पसरलेल्या चेहऱ्यावर दिसून येत होत.

" बाबा... अनय..." मागच्या सगळ्या प्रकारात सर्वात जास्त त्रास अनयलाच झाला होता.... मानसिक... शारीरिक... केवळ माफी मागून त्याचा झालेला त्रास भरून निघाला नसता परंतु.... " बाबा..." भरल्या डोळ्यांनी तिने पुन्हा आपल्या वडिलांना प्रश्न केला.

बाबांनी प्रश्नार्थक नजरेने गुरुजींना पाहिलं. त्यांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत. नजरेनेच खाणाखुणा करत त्यांनी काहीतरी सुचवलं पण बाबांच्या ओठांतून शब्दच फुटेनात.

" बाबा.... अनय... कुठे आहे..?" तिच्या विचारण्यात व्याकुळता होती. आपल्या मूर्खपणामुळे आपण त्याला गमावलं तर नाही ना ह्याची भीती होती...

" अनय... अनय.. अचानक..." त्यांना बोलवत नव्हतं. अनय व ओम दोघेही कुठे गायब झाले होते हे त्यांनाच माहीत नव्हतं तर तिला कसं सांगणार आणि जर तिला ओमबद्दल समजल तर काय होईल ह्या विवंचनेत ते अडकले.

" बाबा.. अनय काय....?" ती जवळपास किंचाळली. तीच सर्वांग रागाने थरथरू लागला. बाबांच्या तोंडून आता काय निघेल ह्याची जाणीव होऊन ती आतल्या आत कोलमडत होती. तिच्या डोळ्यांसमोर ती रात्र उभी राहिली...