एक रस्ता
----------------
पुढे उभे हजार रस्ते
सांगा जाऊ कुठे आता
ध्येयाच्या पुरतीसाठी
निवडु कोणता एक रस्ता
यशाची शिखरे कधीच
सहज चढून होत नाही
प्रयत्नांची पराकाष्ठा
हा एक रस्ता ठायीठायी
येतील त्या-त्या अडचणी
सोडवत पुढे पुढे जाऊ
प्रयत्नशील राहून सदा
आपण शिखरावर झेंडा रोवू
-----------------------
सोनल सुनंदा श्रीधर