मोरपीस....
हळव्या मनांचं, हळव्या क्षणांचं
ते केवळ कृष्णाच्या मस्तकीची शोभा नाही...
ते आहे गुज.., त्याचं आणि त्याच्या राधेचं..
मोरपीसांच्या विविध रंगांकडे पाहिलं आहेत कधी नीट??
सळसळत्या तजेलदार तुकतुकीत मिसळलेपणाकडे???
वेगळे नाही काढता येत ते रंग, ते आकार
पण त्यामुळेच ते सांगतात अवीट प्रेमाच्या गुंफलेल्या भावनांचे अर्थ....
प्रेमाचा निळा, स्नेहाचा हिरवा आणि ठाव घेणारा हृदयस्पर्शी जांभळा....
काढता येतील का हे असे वेगळे????
नाहीच मुळी आणि नकोच मुळी....
गुंफलेले राहू देत ते तसेच एकमेकात,,, म्हटलं तर सुटे.... म्हटलं तर गुंफलेले ....
पण सरतेशेवटी काय तेच तर देतात साक्ष राधा-कृष्णाच्या प्रेमाची,निखालस सत्याची आणि घडवतात सौंदर्याचा मनोज्ञ साक्षात्कार....
आर्या