हुरहुर....
मन येते भरून
ह्रुदयाला चिरून...
डोळ्यात अश्रु ही झुलावे जरा...!
असे वाटते तु असावे जवळ
मनातले अलगद कळावे तुला...!!
भाव जपले किती
तुटून ही प्रिती...
मन कोंडून जगणे जमले मला..!
जिवं मी वाहीला, अबोल का राहिला..
शब्द हरवले कुठे न कळले मला...!!
वाट होती तुझी,
रोज प्रभाती निशी...
हे विरहाचे स्वप्न का असून तू...!
भावनांची गती,गुंग झाली मती..
खरचं दुर गेली का मजपासून तू...!!