Marathi Quote in Blog by Rupali Shirke

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#LoveYouMummy

प्रिय आई,

"आईस पत्र म्हटलं की, हृदय भरुन येत. अस का होतं कुणास ठाऊक? खरचं किती अर्थ समवला आहे या दोन अक्षरी शब्दात!
"आई" काय लिहू गं मी तुझ्याबद्दल? कारण लिहायला गेली तर शब्दच अपुरे पडतात गं." अख्ख ब्रह्मांड आहे तू माझं".तू नसताना मी किती एकटी पडते याची जाणिव मला आता लग्नानंतर होत आहे. लग्नाअगोदर चे दिवस आठवले की वाटतं काय मस्त दिवस होते ते "तुझं प्रेम -माझा हट्ट ,तू पूर्ण केलेल्या माझ्या इच्छा ,तुझ्या रागावण्या -मागील प्रेम ,तू बनविलेल्या माझ्या आवडीच्या पदार्थाची चव " या सगळ्यांची सर कुणीच करु शकत नाही गं.
मी रागात असताना मला समजून घेणारी तुच होतीस,आई खुप मिस करते गं मी हे सगळे. आज सगळचं असुनही क्षणाक्षणाला तू माझ्या सोबत नसतेस,तुझ्याशी फोनवर बोलू शकते पण तुझ्या मायेचा हात माझ्या डोक्यावरुन फिरत असतानाच्या प्रेमकरिता मला किती-किती दिवस वाट बघावी लागते.डोळे भरुन येतात गं आजही तो दिवस आठवला की,जेव्हा तुला सोडून मी एका वेगळ्या कुटुंबात आली. खरं सांगु आई ,मला तुला सोडून कधी जायचंच नव्हतं गं -पण तुच म्हणायचीस इतकं सोप नसतं एकट जीवन जगणं-आम्ही जन्मभर तुझ्या सोबत नसणार ...पण आई तू मला तशीच हवी होती गं आणि याच जन्मी नाही तर अख्ख्या सात जन्मी तूच माझी आई असावी.
आई मला माहिती आहे काही वेळेस मी तुला रागात बोलून गेली असेल आणि माझ्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या गेल्या असतील खरचं त्याकरिता मनापासून सॉरी गं,पण आई त्याची जाणिव मला नंतर व्हायची आणि हृदय भरून यायचं."तुझं गुणगान गावं तितकं कमीच",शेवटी तू माझी माय आहेस.अशी आई जिने स्व्तःकडे दुर्लक्ष करून मला जपले आहे. मनुष्याचे सात जन्म होत असतील तरी या सातो जन्मी मी तुझे ऋण फेडूं शकणारं नाही गं."खुप प्रेम करते गं आई मी तुझ्यावर".
तुझ्याकरिता माझ्या मनातल्या चार ओळी....

"माझी सखी-माझी आई."
"माझं प्रेम-माझी आई."
"माझं हृदय-माझी आई".
"माझं जीवन-माझी आई ".
"माझं ब्रम्हांड-माझी आई ".

तुझीच
रुपु

Marathi Blog by Rupali Shirke : 111043374
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now