# Love You Mummy 1
प्रिय आई ,
आई या एकच शब्दात कित्ती अर्थ सामावले आहेत, आई हे तूला आता पत्र लिहीतांना जाणवतय.
हट्ट ,राग ,प्रेम, चिडचिड ,मागणी तसा पुरवठा ,पाहीजे ते पाहीजे या सगळ्याच एकमेव स्थान म्हणजे तू.
ऊन्हामध्ये थकून भागून झाडाखाली आल्यावर जस वाटत तस तूझ्या छत्रछायेखाली वाटत. माझ तूझ्यावर खूप खूप प्रेम आहे जे मी शब्दात नाही सांगू शकत.
आई तू खूप छान आहे कारण तू खूप सूंदर आहेस मनानं....
आई तू खूप यम्मी आहेस कारण तू आहेस आजची सूपरवुमन ...
आई तू झाडाच मुळ आहेस जे आम्हाला जगण्याचे जीवन सत्व पुरवते.....
या जगातली सर्वात उत्तम आई बस्स माझी आई आहे.
मी तर तूझा एक अंश आहे आणि तू तर या जगाचा सारांश.....
तूझीच
पियू