आई....
आईच्या पदरात शितलतेची छाया...
आईच्या कुशीत वात्सल्याची माया...
आईच्या रागावण्यात अबोल प्रेम...
आईच्या प्रेमात सामावतो संसार सारा...
आई सोबत असली की मी कधी तरी नकळत चिडते...
आई जवळ नसली की तीच्या आठवणीत ढसाढसा रडते...
आईशिवाय जगण्याची करवत नाही कल्पना....
आयुष्यभर फुलासारखं जपण्याचं वचन देते तुला....