Marathi Quote in Blog by Suvidha undirwade

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#LoveYouMummy

प्रिय
आई,
आठवतं आई, लग्नाआधी मी किती भांंडायचे तुझ्याशी? किती चिडायचे, मी घराबाहेर असताना तु सतत फोन करून माझ्या सलामतीची चौकशी करायचीस तेव्हा. तेव्हा वाटायचं, का तू गरजेपेक्षा जास्त काळजी करतेस. पण आता जाणवतं, आईची माया वेगळीच असते.
आता वाटतं,तू फोन करावंस आणि मी बरी आहे ना असं विचारावंस.
खरंच गं आई, तुला कधी सांगितलं नाही, तशी गरजही वाटली नाही.पण आज सांगते, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. असंख्य नात्यातलं प्रेम एकत्र केलं ना तरी ते कमीच असेल, इतकं प्रेम आहे तुझ्यावर.
मला माहित आहे, सगळ्यांच्या नकळत, मनातल्या कप्प्यात बसलेल्या तुझ्या या गुड्डीशी खूप गप्पा मारतेस ना तू. पोहोचतात माझ्या मनापर्यंत, कारण मी ही तेच करते.
मी केलेल्या सगळ्या चुकांना माफी असावी आणि तू सदैव सुखी राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ?

Marathi Blog by Suvidha undirwade : 111042697
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now