Marathi Quote in Blog by Vaijayanti Dange

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#LoveYouMummy
प्रिय आई
या देवी सर्वभूतेषु । मातृरूपेण संस्थिता ।
नामस्तत्स्यी नामस्तत्स्यी नामस्तत्स्यी नमोनमः ।।
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची आणि हक्काची एकाच जागा असते . ती म्हणजे आई . तीच आपल्याला समजून घेते , आधार देते .
'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी . तिच्या पासून लांब गेल्यावरच या श्रीमंतीची खरी जाणीव होते .
माझ्या कौतुकाने तुझा चेहेरा फुलून येतो . असाच तुझा समाधानी चेहेरा कायम दिसावा हीच इच्छा
माझ्या लाडक्या आईसाठी अगदी मनापासून या चार ओळी
आई घराला येते घरपण तुझ्या स्पर्शाने
आयुष्याला माझ्या आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने
तुझी प्रत्येक शिकवण सांगते अर्थ आयुष्याचा
प्रत्येक क्षणी आधार तुझ्या मायेच्या पदराचा
म्हणून एकच मागणे देवाला
खूप खूप सुखी ठेव माझ्या लाडक्या आईला

Marathi Blog by Vaijayanti Dange : 111042654
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now