#प्रेम
फक्त तुझ्यासाठी,
तू यावं पुन्हा कट्ट्यावर या दिवाळी च्या दिवसात, सगळ्यांना बोलावलंय पण तुला call करायचं धाडस होत नव्हतं म्हणून हे पत्र,, प्रेमपत्र समजू नकोस याला कारण खूप पुढे निघून आलोय आता त्या सगळ्यांपासून,, जाब नाही विचारणार कोणीच तुला, तू यावं इतकीच प्रांजळ अपेक्षा... बाकी तर तुझ्या लग्नाला येता आलं नव्हतं त्यावेळी ते बर च झालं म्हणावं लागेल, माझं जाऊ दे पण बाकी सगळे नाराज आहेत तुझ्यावर,, खूप शोधून तुझा number मिळवला तसे तुझ्या सासरी strict वातावरण आहे म्हणे भलतंच, सगळ्यांनी even मी सुद्धा तुला बघून वर्षे लोटून गेलीत, आणि हो आता नाटकाचं खूळ डोक्यातून निघून मी सुद्धा मार्गी लागलोय,,
मागच्या दिवाळीला group च get together कर म्हणत होते सगळे पण तुझं काहीच नेमकं मिळत नव्हतं अर्थात जुन्या सगळ्या गोष्टी खूप बदलतात काही वर्षात,
मग फोन नंबर तर केव्हाच बाद झाला तुझा सुद्धा...
सावध राहून प्रेम करता नसेल येत, पण प्रेमातून सहज बाहेर पडून सगळ्यांची मन संभाळलीत यापेक्षा मोठा समजूतदारपणा म्हणजे तर आता सुद्धा खूप बरं वाटत तुझा विचार करतांना, असो तू सुखात आहेस मस्त वाटलं, म्हणजे अगदीच तुझा कायापालट झालाय, Facebook वर बघितलं मी, तुमचं ज्वेलर्स च दुकानं आहे म्हणे सासरी लवकरच मी येईल बहुतेक खरेदीसाठी, आता तुला जळवण्याचा काही प्रकार वगैरे नाही म्हणजे ताई च्या लग्नासाठी दागिने घ्यायला येईल आईसोबत, असो 204 शब्द उरलेत पत्र अवरतं घ्यावं लागेल, पण नक्की ये कट्ट्यावर या दिवाळी ला सगळे येणार आहेत आणि हो आधी काही असेल पण त्या सगळ्या आधी सुरुवात तर आपण मैत्रिपासूनच केली होती ना, लवकरात लवकर येणे आणि हो जमलं तर अनंत ला सोबत आण, खूप गोंडस बाळ आहे photo बघून काय मज्जा ??सगळ्यांनी सांगितलंय so एकदम निश्चिन्त होऊन ये कट्टयावर भेटुयात बाकी भेटून बोलू...
"सौरभ