#LoveYouMummy
प्रिय आई,
मी हाँस्टेलला आल्यापासुन खुप शहाण्यासारखं वागते. पण एक सांगु, इथल्या मोबाईलवरील गाण्यांना तुझ्या अंगाईची सर नाही. इथल्या भेळ,पिझ्झा,बर्गरला तुझ्या हाताची चव नाही. इथल्या कँडी क्रशला तुझ्या जुन्या साड्यांचे घरं बनवुन खेळभांडी खेळण्याइतकी मौजही नाही. नेटवरील वेगवेगळ्या हेअरस्टाईल ट्राय करते पण तेल लावुन तु घातलेल्या दोन वेण्यांची शान त्यात नाही. पार्लरच्या मेकअपला तुझ्या गंध,पावडर आणि काजळाची बरोबरी नाही. इथल्या थ्रीडी मुव्हीला तु सांगितलेल्या चिमणी कावळ्याच्या गोष्टीचा फिल नाही.
तुझ्या कुशीत येणारी सुरक्षित झोप,तुझ्या मिठीतील ऊब,तुझा गोड पापा हे तुझ्याशिवाय इतर कोणीच देवू शकत नाही. मी खुप नशिबवान आहे की तुझ्या पोटी जन्म घेतला. लव यु..मिस यु..
तुझीच
सोनु
साधनावालचंदकस्पटे©