#LoveYouMummy
प्रिय आई!
तुझं सगळ्यांवर असलेलं प्रेम, मैत्र आणि सर्वांना आपलंसं करण्याचा स्वभाव! आपल्या शारीरिक व्यंगावर मात करून तू मला जन्म दिलास आणि माझ्या दुडदुड धावण्यात तू तुझं पायातलं व्यंगच विसरलीस की!
तुझ्या कुशीत आनंद, वात्सल्य अनुभवत समाज पाहिला मी.
तुझ्या रुग्णांची तू डाॅक्टर नसून आईच होतीस.अनाथालयातल्या मुलींचं कन्यादान केलंस तू बाबांच्या बरोबर. त्यांची बाळंही प्रथम तुझ्याच हातात विसावली!
अशी तू माझी आई! केवळ माझीच नसून सर्वांचीच आहेस तू आजही!
परमेश्वरावरही करतेस बहुधा आता तितकंच प्रेम तू! पावसाच्या रूपाने बरसतो तो पृथ्वीवर हेच सांगत मला की "तुझ्या" प्रेमळ आईच्या प्रेमाचा अंशच पसरवतो आहे मी हा, तिच्या जिव्हाळ्याच्या सर्वांसाठीच!!
तुझी,
बेटू.