मनात हजार प्रश्न उभे करून गेली
ती एका क्षणाची शांतता....
बोलत तू ही होतास,
बोलत मी ही होते...
मध्येच मौन देऊन गेली,
ती एका क्षणाची शांतता.....
बोलता बोलता तू गप्प झालास,
का कुणास ठाऊक,
मला ही बोलायचं सुचलं नाही..
तेव्हा,
' अंम्' शब्दाची वाट देऊन गेली,
ती एका क्षणाची शांतता.....
डोक्यात विचार, डोळ्यात विश्वास,
ओठावर भास, क्षणभराची आस,
आणि,
काळजात काहूर उठवून गेली,
ती एका क्षणाची शांतता.....
मनात हजार प्रश्न उभे करून गेली,
ती एका क्षणाची शांतता.....