#राष्ट्रीय काव्य लेखन प्रतियोगिता
#kavyotsav
प्रियदर्शनी...
प्रथम दर्शनी
अनोळखी मी , नावापुरती ओळखीची तू...
द्वितीय दर्शनी
विचारांती मी , निर्विचार तू...
तृतीय दर्शनी
खट्याळ मी , निरागस तू...
चतुर्थ दर्शनी
उत्साहित मी , आतुर तू...
पंचम दर्शनी
प्रेमपूर्ण मी , मैत्रीपूर्ण तू...
षष्टम दर्शनी
प्रेमार्थी मी , नकारार्थी तू...
सप्तम दर्शनी
मैत्रीपूर्ण मी , भावशून्य तू...
अष्टम दर्शनी
भावघन मी, भावना विरहित तू...
नवम दर्शनी
विचारांती मी, निर्विचार तू ...
दशम दर्शनी
अनोळखी मी , नावापुरती ओळखीची तू !!