Marathi Quote in Whatsapp-Status by Patrkar Ganesh Chavan

Whatsapp-Status quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

जेऊर प्रतिनिधी गणेश चव्हाण

नरेंद्र मोदींचे २०१९ मध्ये पंतप्रधानपदाचे स्वप्न ‘ हा ‘ देश करू शकतो भंग

मागच्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय तेल बाजारात सातत्याने वाढणाऱ्या इंधन किंमतीमुळे नरेंद्र मोदी सरकारवरील दबाव वाढत चालला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती केव्हाच नियंत्रण मुक्त केल्या आहेत. त्यामुळे तेल कंपन्या रोजच्या रोज पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करत असून सामान्य जनता होरपळून निघत आहे . मागचे सलग दहा दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत होत पेट्रोल आता चक्क ८५ रुपये प्रतिलिटरच्या पुढे गेलेले आहे . त्यामुळे लोकांमध्ये नाराजी वाढत चालली असून हे असेच सुरु राहिले तर पुढच्या वर्षी होणाऱ्या २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाला मोठा फटका बसू शकतो.
नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यापासून सौदी अरेबियाबरोबर दृढ संबंध विकसित करण्यावर भर दिला आहे पण नरेंद्र मोदींच्या अडचणी वाढवण्यामध्ये काही प्रमाणात सौदी अरेबियाचा सुद्धा मोठा सहभागी आहे. प्रति बॅरल तेल पिंपाची किंमत ८० डॉलरपर्यंत नेण्याचे सौदी अरेबियाचे उद्दिष्टय असून मोदी सरकारच्या सुदैवाने सत्तेवर आले तेव्हा आंतरराष्ट्रीय तेल बाजारात भाव पडले होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्ही स्वस्ताई आणली अशी देखील आवई उठवण्यात आली होती.

ह्या गोष्टीमुळे मोदी सरकारची पहिली तीन वर्ष सुरळीत गेली. त्यावेळी सरकारला कमी किंमतीत तेल मिळत होते. पण सरकारने करकपात किंवा अन्य कुठल्याही मार्गाने जनतेला त्या कमी दराचा कोणताच फायदा मिळू दिला नाही. बॅरलचे रेट वाढण्याचे कारण दिले जात असले तरी यापेक्षा देखील जास्त रेट बॅरलचे मनमोहन सिंह यांच्या काळात झालेले आहेत . रोजच्या पेट्रोल दरवाढीने सरकारवर दबाव वाढत आहे. स्थानिक करांमध्ये कपात केली तरी केरोसीन आणि घरगुती वापराच्या गॅसवरील अनुदानाचा खर्च वाढत आहे. टॅक्स कमी करण्याच्या मागणीला याआधीच केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये विविध करांचा समावेश झाल्यामुळे आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतात. पेट्रोलच्या किंमतीमध्ये करांचा वाटा ५० टक्के तर डिझेलच्या किंमतीमध्ये ४० टक्के करांचा वाटा असतो. पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कर, वॅट आणि डिलर्सचे कमिशन आकारले जाते. वॅटचा कर प्रत्येक राज्यानुसार बदलत जातो त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळया असतात.
बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवण्याची परंपरा भाजपने राखली.

-वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद शहर अध्यक्ष शिवम कोठावळे, गणेश चव्हाण

Marathi Whatsapp-Status by Patrkar Ganesh Chavan : 111033792
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now