एका कोपऱ्यात उपाशी बाळ,
कोरड्या भाकरीसाठी डोळे पुसतं काळ.
दुसऱ्या कोपऱ्यात हट्टाचा गजर,
पिझ्झासाठी रडतो लेकरू अधीर.
अश्रूंचे प्रवाह वेगळे जरी,
भिजवितात तेच धरणीवरील सारी.
कदाचित जगण्याची हीच विडंबना—
भुकेलाही असतो एक रंग सदा...
By Fazal Abubakkar Esaf