कोरोनाने खरंच दाखवून दिलं… कोण आपल्यावर किती प्रेम करतंय ते.
कित्येक मुलं आपल्या आईबाबांच्या, कुटुंबियांच्या प्रेतेकडे फिरकलीसुद्धा नाहीत…
कित्येक बायका नवऱ्यांपासून दूर पळाल्या… आणि नवरे त्या प्रेमाच्या नावाने गळा काढणाऱ्या बायकांपासून चार हात लांब राहिले…Vice -Versa
तेच लोक जे रोज "आय लव्ह यू", "सोनू", "मोनू" करत होते,
तेच या महामारीच्या सावलीत केवळ स्वतःचा जीव वाचवण्यात व्यग्र होते…
म्हणतात ना…
प्रेम जर खोटं असेल, तर एक दिवस उघड होतंच.
आणि जर खरं असेल, तर ते 'टायटॅनिक'सारखं असतं —
जहाज बुडत असलं तरी, तो म्हणतो…
"मी तुझ्यासोबत आहे."
हेच खरं प्रेम… जे वेळेच्या वादळात उभं राहतं.
बाकी सगळं — केवळ शब्दांचा गाजावाजा!