"स्वप्नपंख"
घेऊनिया आकाशात उंच भरारी,
स्वप्नांनी साकारली चंद्रावर स्वारी..
स्वप्नांत असते मजबूत शक्ती,
केला प्रयत्न तर होईल क्रांती..
करून निश्चय टाकावे पुढचे पाऊल,
तेव्हाच लागेल ना सुखाची चाहूल...
आहे चुकीचे अंथरूण पाहून पसरावे पाय,
वाढवूनच टाका त्या अंथरुणाची लांबी महाकाय...
भिंतीच्या आधी साकारा चित्र,
बदलून टाका मग ते जुने सूत्र...
स्वप्नांत दिसते न्यारी किमया,
क्षणांत पालटून जाते ही दुनिया...
भरावे बळ पंखांत स्वप्नांच्या,
तसा मनाचाच बनवावा साचा...
नुसती स्वप्ने पाहून होणार नाही काही,
अखंड प्रयत्नांवाचून दुसरा उपायच नाही...
मजबूत आहेत या स्वप्नपंखांचे धागे,
चला उठा झोपेतून व्हा लवकर जागे...
चला उठा झोपेतून व्हा लवकर जागे...
- सुरज काशिनाथ कांबळे