#नाश्ता_टाईम
मूग भजी
एक दिवस मुगाचे आप्पे केलें
त्यातील थोडे मिश्रण उरले होते
त्याचे परत पुरेसे आप्पे होणार नव्हते
मग याची भजी करावी असे योजले.
सकाळीच मिश्रण फ्रीज मधून बाहेर काढून ठेवले
मिश्रण साधारण दिड वाटी होतें
त्याचा गार पणा कमी झाल्यावर त्यात अर्धी वाटी रवा व थोडे मीठ घातले
मिश्रण एकत्रित करून बाजूला झाकुन ठेवले
तासा भराने कढईत तेल गरम करून छोटी भजी खरपुस तळुन काढली
रवा घातल्यामुळे बाहेरून छान कुरकुरीत लागत होती..
शिवाय भरपूर भिजल्याने चांगली टम्म फुगली होती .🙂