🌼तांदळाच्या पिठाचे वडे
🌼साहित्य
दोन वाट्या तांदुळ पीठी
पाव वाटी दही
चमचाभर ओवा
चमचाभर बडीशेप
चवीनुसार मीठ
पाव चमचा हळद
🌼कृती
तांदळाच्या पिठात बडीशेप, ओवा ,हळद मीठ आणि दही घालून
कोमट पाण्याने पीठ घट्ट भिजवावे
अर्धा तास झाकून ठेवावे
नंतर कढईत प्रथम तेल कडकडीत गरम करावे
नंतर गॅस मध्यम आचेवर ठेवावा
भिजवलेल्या पिठाचा छोटा गोळा घेऊन हतावर थापून मध्ये भोक पाडून खरपुस तळुन घ्यावे
छान कुरकुरीत होतात
सोबत ओले खोबरे पुदिना चटणी...
🌼आणि सलाड फ्रुट डिश
टोमॅटो ,काकडी, अननस , मोसंबी,पपई. याच्या फोडी