♦️खसखस साटोरी
♦️मध्यंतरी कोणार्क ट्रिप वर गेलो होतो तिथे खसखस खुप स्वस्त मिळाली
अगदी शंभर रुपये पाव कीलो 😊
तिथं जवळचं अफूची राने आहेत
अफूची बोंडे म्हणजे खसखस
आपण खसखस फार वापरत नाही..
कधीतरी अनारसे साठी
कधीं खीर इतकेच
इतकी स्वस्त खसखस म्हणल्यावर मोह पडलाच विकत घेण्याचा 😃
आता खसखस चे वेगळे प्रकार करणे आलेच ओघाने
खसखस वडी ..
खीर आणि बरेच काही
त्यात हा एक प्रकार करून पाहिला छान झाला होता
♦️साहित्य
एक वाटी मैदा
मीठ चवीप्रमाणे
अर्धी वाटी खसखस
अर्धी वाटी बारीक केलेली साखर
वेलदोडे पुड चवीनुसार
पाव वाटी तुपाचे मोहन
♦️कृती
प्रथम मैद्यात मीठ घालून
कडक तुपाचे मोहन घातले व पीठ घट्ट भिजवून झाकून ठेवलें
खसखस मंद आचेवर भाजून घेतली
गार झाल्यावर त्यात वेलदोडे पुड आणि बारीक केलेली साखर मिसळली
व आतले सारण तयार केले
भिजवलेल्या पिठाचे दोन गोळे करून
पुरीप्रमाणे लाटून
मधल्या भागात सारण भरले
हाताने थोडे दाबून सारण पुरीवर पसरून घेतले
♦️हलक्या हाताने जितक्या जमतील तितक्या पातळ पोळ्या लाटल्या
तूप सोडून खमंग भाजुन घेतल्या
एकदम खुसखुशीत झाल्या 😊