🫒 मटार फ्राय राइस
आता मटार सिझन संपत आला बर का
आज बाजारात फक्त आमच्या एका ओळखीच्या माणसाकडे मटार होतें
होऊन जाऊ दे आता मटार पदार्थांचा शेवटचा राऊंड 😊
मटार ची पिशवी हातात देत..
अहो ची अशी माहिती वजा "फर्माईश" आली 😃
तसे मटारचे अनेक प्रकार या सिझन ला अनेक वेळा करून झालेत...
ग्रुप वर पोस्ट पण केलेत 😊
पण आता हा राऊंड परत करूया पुरा 😃
आज मटार फ्राय राइस करून टाकू
🫛साहित्य
दोन वाटी मटार
एक वाटी मोठा बासमती तांदुळ
दोन मिरच्या मधे चिरुन तुकडे करून..
दोन कांदे उभे पातळ चिरुन
जिरे
आठ दहा काजु
खडा मसाला.. खालील प्रमाणे
दोन वेलदोडे
एक पान जावित्री
चार पाच लवंग
दालचिनी तुकडा
चक्र फूल
मसाला वेलची एक
मीठ चवीनुसार
🫛कृती
प्रथम बासमती तांदुळ एका वाटीस एक वाटी या प्रमाणात शिजवून घ्यावा.
भात गार झाला की काटे चमच्याने मोकळा करून घ्यावा
यात मिरच्यांचे तुकडे व मीठ घालून चांगला एकत्र करून घ्यावा
🫛मटार पाण्यात वाफवून घ्यावा.
पातळ कांदा व काजु तळून घ्यावेत
🫛पातेल्यात तूप घालून
जिरे व सर्व खडा मसाला घालून परतावे
वाफवलेले मटार घालून परतावे
त्यावर मिरची व मीठ घातलेला भात घालून परतून झाकण ठेवून एक वाफ आणावी.
🫛यानंतर तळलेले काजु मिसळून घ्यावे.
तयार भातावर बारीक चिरलेली कोथिंबीर व तळलेला कांदा घालून खायला घ्यावे.
सोबत केशरी गोड खरबूज फोडी
🫛आपापल्या आवडीप्रमाणे दही रायते घेऊ शकता