वाल पापडी मेथी गोटे भाजी
या दिवसांत बाजारात वालपापडी चांगलीं कोवळी मिळते
कोवळी मेथीही उपलब्ध असते
साहित्य
सोललेली आणि तुकडे केलेली वाल पापडी दोन वाट्या
बारीक चिरलेली कोवळी मेथी वाटीभर
डाळीचे पीठ वाटीभर
तिखट ,मीठ ,ओवा ,तीळ ,हळद
गरम मसाला, गुळ
दाण्याचे कूट
बडिशेप
कोथींबीर ,ओले खोबरे
फोडणीचे साहित्य
कृती
प्रथम बारीक चिरलेल्या मेथी मधे हळद, तिखट , मीठ ,ओवा ,तीळ , बडीशेप ,व डाळीचे पीठ घालून गोळा करून घ्यावा
दहा मिनीटे झाकुन ठेवा
त्यानंतर हव्या त्या आकाराचे गोल गोटे करून मंद आचेवर तळून घ्यावेत
यानंतर तेलात मोहरी ,हिंग ,हळद घालून फोडणी करून सोललेली वाल पापडी घालावी
झाकण ठेवून चांगली वाफ द्यावी
त्यात वाल पापडी बुडेल इतकेच पाणी घालून शिजवावे
वाल पापडी शिजली की त्यात
तिखट, मीठ ,हळद ,काळा मसाला, गूळ,दाण्याचे कूट घालून
परत एक वाफ द्यावी
शेवटी मेथी गोटे घालून पाच मिनिटे झाकण ठेवावे
व नंतर कोथींबीर ओले खोबरे घालून सजवावे
गरम भाकरी अथवा पोळी सोबत खायचा घ्यावी