☀️गुळ पापडी
(थोडी हटके चवीची 😋)
☀️सर्वांचा आवडता
आणि झटपट होणारा प्रकार
ही गुळपापडी थोडया वेगळ्या चवीची आहे
☀️साहित्य
एक वाटी कणीक
अर्धी वाटी तूप
एक मोठा चमचा कोको पावडर
पाऊण वाटी पेक्षा थोडा जास्त गूळ
(कारण कोको पावडर थोडीशी कडवट चवीची असते)
☀️कृती
गुळ किसून घेणे
प्रथम कणीक कोरडीच भाजुन घेणे
हळुहळु तूप घालत कणीक खमंग वास येइपर्यंत भाजणे
☀️खाली उतरवून त्यात पाऊण वाटी गूळ व कोको पावडर घालून चांगलें मिसळून घेणे
तूप लावलेल्या थाळीत थापून
वरुन आवडतील ते ड्राय फ्रूट लावणे
(मी सिडस वापरले आहेत)
थोडे कोमट झाले की वड्या पाडाव्या
☀️कोको पावडर मुळे रंग छान येतो
कोकोच्या स्वादा मुळे वेलदोडे पावडरची गरज पडत नाही
वेगळी चव असलेली ही गुळपापडी मस्त होते