🥕फ्लॉवर मटार गाजर सुकी भाजी
🥕साहित्य
एक मोठी वाटी फ्लॉवर चे तुकडे
गाजर तुकडे
मटार वाटीभर
तिखट मीठ चवीनुसार
एक चमचा गरम मसाला
एक चमचा कसुरी मेथी
चमचाभर साखर
कोथींबीर खोबरे
🥕कृती
फ्लॉवर गाजर चे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावे
तेलाची फोडणी करून त्यात जिरे मोहरी हिंग घालावा
नेहेमीच्या फोडणी पेक्षा तेल थोडे जास्त घालावे
🥕प्रथम तेलात फ्लॉवर चांगला तपकिरी होई पर्यंत परतावा
त्यानंतर गाजराचे तुकडे असेच परतावे
यानंतर मटारचे दाणे घालुन झाकणं ठेवावे
🥕पाच मिनिटांनी परत थोडे हलवून झाकणं ठेवावे
यानंतर पाण्याचा हबका मारून परत झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी
आवडत असल्यास एक चमचा साखर घालावी
तिखट मीठ गरम मसाला कसुरी मेथी घालून चांगली परतून घेउन
मसाला मिळून येण्यासाठी परत पाच मिनिट झाकणं ठेवावे
🥕चविष्ट भाजी तयार आहे😋
पाण्याचा अंश अत्यंत कमी असल्यानं भाज्यांची मूळ चव कायम राहते
🥕कोथींबीर खोबरे घालून सजवावे