बाजरीचे धिरडे
बाजरी पीठाची चव थोडी कडवट असते
खुप जणांना ती आवडत नाही
रोज आवडीने बाजरीची भाकरी सुध्दा बरेच लोक खातात.
मी नेहेमी बाजरी ज्वारी मिसळून भाकरी करते.
कित्येक वेळा बाजरीचे पीठ आणले जाते पण वापर करायचा राहून जातो.
भोगीला बाजरीची भाकरी खायची असतें म्हणून पीठ आणले जाते.
त्या दिवशी वापर होतो
मग पीठ पडून राहते
काही दिवसांनी त्याची विरी जाते
भाकरी जमत नाहीत, तुटतात
अशा वेळी ही धिरडी करून पहा
चविष्ट होतात आणि पीठही वाया जात नाही
साहित्य
दोन वाटी बाजरीचे पीठ
एक बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथींबीर
दोन मिरच्या बारीक चिरुन
हळद अर्धा चमचा
एक वाटी आंबट ताक
जीरे
मीठ चवीनुसार...
कृती
प्रथम बाजरीच्या पीठात कांदा मिरची कोथिंबीर हळद घालून ताकात भिजवा
ताक जास्त नको असेल तर पाणी वापरा व सरसरीत भिजवा.
अर्धा तास भिजवून
चवीनुसार मीठ घाला
पीठ एकसारखे करून गरम तव्यावर धिरडी घाला
पीठ फार जाडसर नसावे
धिरडे घातल्यावर झाकण ठेवू नका
कडेने तेल सोडून कुरकुरीत करून घ्या
परत उलटून दुसरी बाजू भाजायची गरज नाही
मस्त कुरकुरीत होतें
सोबत आवडीची चटणी घ्या.