#भरड_धान्य_पाककृती
मिश्र पीठाची थालिपीठ..
साहित्य
एक वाटी ज्वारी पीठ
एक वाटी बाजरी पीठ
एक वाटी नाचणी पीठ
अर्धा चमचा ओवा
एक कांदा बारीक चिरून
चिरलेली कोथींबीर
तिखट मीठ हळद चवीनुसार
ओट्स एक वाटी
काळे तीळ पांढरे तीळ अर्धी वाटी
कृती
तीनही पीठे एकत्र करून त्यात आवडीप्रमाणे कांदा. कोथिंबीर. तिखट. हळद . मीठ ओवा घालून भिजवून घेणे
पीठ फार पातळ नको फार घट्ट नको
थोडे सरबरीत हवे
दहा मिनीटे पीठ भिजले की
तव्यावर तेल टाकून थालिपीठ लावावे
वरती काळे तीळ, पांढरे तीळ, ओटस व 🌶️ चीली फ्लेक्स लावावे
थोडेसे दाबून घेऊन नंतर थालिपिठाला भोके पाडावी त्यात तेल सोडावे
झाकण ठेवून खरपुस भाजुन घ्यावे
एक बाजु झाल्यावर उलटून परत झाकण न ठेवता खरपुस करून घ्यावे
चविष्ट होतात लोणी ताक अथवा दह्या सोबत द्यावें
🌶️ चिली फ्लेक्स वापरणार असल्याने
पीठ भिजवताना तिखटाचे प्रमाण कमी असावे