#बाजार
महाबळेश्वर लोकल बाजार
हे थंड हवेचे ठिकाण अतीशय महागडे म्हणून प्रसिद्ध आहे😀
पैसे खर्च करायला लोक ईथे येतात त्यामुळे पूर्ण बाजारात स्वस्ताई कधी दिसणार नाही
तिथल्या फळांची अथवा भाज्यांची चांगली खरेदी करायची असेल तर
मुख्य रस्त्याच्या अगदीं वरच्या टोकाला जो बाजार भरतो तो अतीशय स्वस्त आणि रास्त किमतीचा असतो
तिकडे जायला हवे
त्यातल्या त्यात दुकाने उघडण्या पूर्वी तुम्ही या रस्त्यावर चक्कर मारली तर खुप छान ताजी ताजी भाजी किंवा फळे तुम्ही घेऊ शकता
जवळपासच्या गावात राहणारे शेतकरी पुरुष अथवा बायका आपल्या शेतातील पीक म्हणजे फळे भाज्या वगैरे ईथे विकायला घेउन येतात
एकतर दुकाने अजुन उघडली नसल्याने त्यांना बसायला जागा सापडते
आणि दुसरे म्हणजे आणलेला माल पटपट विकून त्यांना परत त्यांच्या शेतात काम करायला जायचे असते
सकाळी सहा ते साधारण नऊ पर्यंत तिथल्या दुकानांच्या दारात जवळपासचे शेतकरी आपल्या शेतातल्या भाज्या फळे घेउन बसतात
दुकाने उघडे पर्यंत त्यांचा धंदा चालतो
नंतर ते आणलेला माल संपवून पुन्हा गावाकडे चालू लागतात.
कारण दुकाने उघडली की बसायला इथे जागा नसते .
मी तिकडे गेले तेव्हा असाच सकाळीं बाजार केला तेव्हा परीक्षेचा मोसम असल्याने सिझन थंड होता
स्ट्रॉबेरी शंभर रुपये किलो मिळाली
अतिशय गोड लाल जर्द शिवाय विक्रेत्याने उभ्या उभ्याच आम्हाला ओंजळभर नुसती चव पाहायला म्हणून दिली होती
मलबेरी ,तुती, रासबेरी अशीच पन्नास रुपये बॉक्स ने मिळाली
तिथले आणखी एक मस्त फळ म्हणजे गुजबेरी
सुंदर पिवळ्या धमक कागदी मुकुटात असलेले हे रसदार पिवळे फळ अतिशय चवीष्ट😋
गोड असो अथवा आंबट रसदार आणि मन तृप्त करणारे🙂😃
किती खाल्ले तरी समाधान होत नव्हते.
हे फळ म्हणजे निसर्गाचा नजराणा म्हणता येईल
ईथे पण विक्रेत्याने दोनशे रुपये तीन किलो दराने दिली शिवाय आग्रहाने भरपेट( पैसे ना घेता) तिथेच खायला घातली ती वेगळीच
तेव्हाचे भाज्यांचे दर...
मोठ्या पानांची कढीलिंब पेंडी ..पंधरा रुपये..
लाल मुळा वीस रुपये पेंडी
लाल गाजर वीस रुपये पेंडी
मोठ्या पानांचा पुदिना पंधरा रुपये पेंडी
छोटे चेरी टॉमेटो वीस रुपये किलो
दोन किलो तीस रुपयाला घेतलें
लेट्यूस पंधरा रुपये भारा 😃
(आपण शहरात मॉल मध्ये सत्तर ऐशीला दोन डहाळ्या घेतो)
चाळीस रुपयाला तीन भारे घेतलें
काजूच्या फळा सारखे दिसणारे लालचुटुक जाम फळ अतिशय गोड वीस रुपयाला दोन
विकणाऱ्या बाई ने वीस ला तीन दिली
कणीस एक दहा रूपये
ब्रोकोली.. वीस रुपये दोन गड्डे
चार गड्ड्यांची केली खरेदी 😃
शेतीचा माल विकायला आलेल्या जवळपासच्या खेड्यातील बायकांना पण लगबगीने घराकडे जायची गडबड होती
घरची कामे शेतीची कामे वाट पहात असणार .
छोटे बटाटे वीस रुपये किलो
थोडेसे घेऊ म्हटले तर तो माणूस म्हणाला हे सगळे पोते घेउन जा 😃
काय करणार एवढे आम्हीं असे विचारले तर म्हणतो नुसते उकडून खा छान लागतो😋
बटाटे वाल्या मामा ला शेतात जायची गडबड होती अडीच ते तीन किलो बटाटा पोत्या सकट पन्नास रुपयाला देऊन तो निघून गेला 😃
अशी स्वस्ताईची कमाल होती अगदीं त्या सिझन ला 😃😃