।। हरवली ती पाखरे ।।
हरवली ती पाखरे
जी सकाळी निजली होती
काळाचा तो आघात होता
ज्यात ती सापडली होती .......
निष्पाप होता तो जीव रे
डोळे पण उघडली नव्हती
एकट्या त्या जीवाने
दूनिया पण बघितली नव्हती......
कोरडा पडला तो उदर रे
नऊ महिने त्यात घेतला श्वास होता
रडला होता तो आकाश रे
अग्नि तांडव मध्ये जो थांबला होता.......
बाळ,तान्हा, सोनुला रे
आईची ती आर्त हाक होती
अश्रु थांबत नव्हती
मातेला सोडून जेव्हा पाखरे उडाली होती......
।। गितेश ल. किसान ।।🖊🖊🖊🖊