प्रथा पडली मुलीला परक करायची
सासरी गेल्यावर माहेरी यायला परमिशन मागायची
मुलीच काळिज तुटल तरी हसुन सगळ विसरायचं
मुलीचा त्रास दिसला तरी अश्रु सगळे सुखवायचे
जाताना तिला थांब म्हणायचं असतं पण
परकी झाली ती हे मनाला पण सांगायचं असत
हसुन तिला निरोप द्यायचा असतो
आणि ती गेल्यावर सगळ घरभर तिला शोधायचं असत
सासर माहेर दोन उंबरे तिला दिले हातात
पोरं जावी माहेरून हा विचारच असतो जीवघेणा...
थांबते का आज?? विचारून तिला हळूच बघते
पोरीचा ही जीव तुटतो जेव्हा ती नाही म्हणते..
.डोळ्यात आलेल्या पाण्याला ती हळुवार लपवते
आई आता परत कधी येते काय माहित
अस म्हणून ती जड जड पाऊल घराबाहेर टाकते...
येते आई बाबा अस म्हणून ती डोळ्यासमोरून नाहीशी होते ...
आई आपली जाईपर्यंत तिला बघतच असते
पोहचली का ग ताई म्हणून शंभर फोन करते...
आई ती आईच असते ती पण तीच घर सोडून सासरी आलेलीच असते ..