सर्वपित्री अमावस्याचे महत्त्व
सर्वपित्री अमावस्येच्या तारखेला एक विशेष महत्व व स्थान आहे. सर्वपित्री अमावस्या म्हणजेच महालय अमावस्या किंवा सर्वपितृमोक्ष अमावस्या. हि पितरांना निरोप देण्याची शेवटची तिथी असते. हा वर्षातील एक महत्वाचा दिवस आहे. सर्वपित्री अमवस्याची विधी पूजा खूप महत्वाची आहे.
असे मानले जाते कि या दिवशी जो माणूस आपल्या पुर्वजांना श्रद्धेने आणि विश्वासाने निरोप देतो त्यांच्यावर पितरांचा आशीर्वाद तर राहतोच, त्याचबरोबर सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी त्याच्या आयुष्यात टिकवून राहते. महालयाची सुरुवात अनंत चतुर्दशी नंतरच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला होऊन ती अमवस्याला संपते.
जर का आपल्याला पूर्वजांची मृत्यूची तिथी माहित नसेल अशा वेळी देखील आपण त्यांचे श्राद्ध अमवस्याला करू शकतो आणि म्हणूनच या अमावस्येच्या तिथीला सर्व पित्री मोक्ष अमावस्या असे म्हणतात.
शास्त्रांप्रमाणे या दिवशी नियमपुर्वक श्राध्द केल्याने अतृप्त आत्माना मोक्ष मिळतो. परंतु प्रत्येक काम व विधी मनपूर्वक आणि श्रद्धेने केल्याने पुण्य प्राप्त होतं. म्हणून श्राद्ध कार्य हेतू काही महत्वाचे नियम पालन करून श्राद्ध क्रिया चागल्या प्रकारे पार पाडावी त्यामुळे आपल्या पितरांना शांती आणि मोक्ष प्राप्त होऊन त्यांनी अंतनकाळापर्यत स्वर्गात सुख प्राप्त होते.
पित्रुपक्षात दान करणे खूप शुभ मानले जाते. अशा या काळात तुम्ही तुमच्या क्षमते नुसार कोणत्याही वस्तू दान करु शकता..
Article By - Anjali Patil
Brainsmedia Solutions