अंगारिका संकष्टी चतुर्थी
कोणत्याही पुजेची सुरुवात आपण सर्वजण श्री गणेशाचे पूजन करून करतो. भारतीय कालगणनेनुसार कृष्ण पक्षातील चौथा दिवस म्हणजे चौथी तिथी मंगळवारी आली तर त्या तिथीला अंगारिका चतुर्थी म्हणतात.
असे म्हणणे आहे कि अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट आपल्या आयुष्यात येत नाही किंवा संकट निवारण होते अशी भाविकांची समज आहे. ज्या गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीचे व्रत किंवा उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारिका मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी कि ज्यामुळे २१ संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन हि दिले गेले आहे. सर्व गणपती मंदिरात अंगारिका संकष्टी मोट्या थाटामाटाने केली जाते. अंगारिका संकष्टी चतुर्थीला, भक्तगण पहाटेपासून संध्याकाळ पर्यंत कडक व्रत ठेवतात आणि या रात्री मात्र गणेश अंगारिका श्लोक म्हणून व चंद्र दर्शन घेऊन आणि गोड नैवेद्य दाखवून व दीप - धूप करूनच उपवास सोडतात.
अशाप्रकारे तुमच्या आयुष्यातील आनंद त्या विघ्नहर्त्याच्या काना एवढे विशाल असावा, अडचणी उंदीरा इतक्या लहान व आयुष्य त्यांच्या सोंडी एवढे लांब व संपूर्ण जीवन मोदका सारखे गोड राहू देत हीच गणेश चरणी प्रार्थना....
तुम्हा सर्वांना अंगारकी संकष्टी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा……
Article By
Anjali Patil
Brainsmedia Solutions