समर्पण....
डॉ. स्वाती अनिल मोरे
समर्पण हा भाव स्त्रीचा....
समर्पण हा ठाव तिचा,.
समर्पित मी तुला...
जशी राधा कृष्णाला...
सीता रामाला...
रमा माधवाला....
समर्पित मी तुला...
जशी नदी सागराला...
धरती आकाशाला...
समर्पित मी तुला ...
स्वत्व माझे विसरून...
सख्या, खंत माझी एकच...
कळली तुला राधा,
वाचलीस तू रमा,
उमगली तुला सीता,
पण का रे कळली नाही...
तुला माझ्या मनाची व्यथा....!!