आठवते अजून तुझं नाव. हृदयावरचा जखमी घाव
प्रेमासाठी केलेले दिव्य
प्रेम प्रेम उदात्त भव्य
प्रेमात सर्व क्षम्य असतं
प्रेमभंगात तसं कां नसतं
दिवस-रात्र रोज येते जाते
जगणे प्रकाशते... अंधारते
माणूस विसरतो कठीण दिवस
प्रेमासाठी केलेले सोयीस्कर नवस
प्रेम अडीच अक्षराची किमया
दोन मनांची प्रेम दुनिया...
दोन ह्दयातली आग...
अगं... ग... ग...
-Chandrakant Pawar