Marathi Quote in Poem by Chandrakant Pawar

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

गाडीत थंड हवा...
बाहेर झुळुक वारा... तुला पेंग आली की ग्लानी... अलगद खांद्यावर रेललीस... प्रथमच बोललीस...
सॉरी हं... तिथेच पटलीस... एकदम हसलीस... म्हणालीस...
ते झोपेचे नाटक खोटे.
खरं काय ते बोल ना... ओहो... ओ...हो...ओ हो हो...
झकास लाजलीस .
हलकेच पुटपुटलीस.
सगळं सांगायलाच हवंय... ओळखता येत नाही मनातलं.
गाडीतून उतरताना आग्रह भारी...
इथेच उतर... उतर ना..
मात्र उत्तर ऐकून हिरमुसलीस.
नाही जमणार... जायचं आहे महत्त्वाच्या कामासाठी. पुन्हा भेटू लवकरच... आश्वासनावर नाराजलीस. मनात विचारचक्र भयंकर सुरू...
कोण ग तू... कुठची ग तू... स्मार्टफोन कायम बंद तुझा. तेव्हापासून शोध सुरु माझा ...
पत्ता माहीत नसलेल्या अपूर्ण प्रेमाचा...
महाशोध प्रिय बेपत्ता प्रियतमेचा...

-Chandrakant Pawar

Marathi Poem by Chandrakant Pawar : 111736441
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now