दुःख अडवायला उंबऱ्यासारखा ..
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा...
वाट चुकणार नाही जीवनभर तुझी..
कर तू मित्र एक आरशासारखा...
आत्महत्याच करणार नाही कुणी..जवळ असेल जर मित्र मनासारखा..
त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा ..
बस धडा "मैतरी" वाचण्यासारखा..
मैत्री चाटते ,गाय होऊन मना..
जा बिलग ..तू तिला.. वासरा सारखा..
✍️✍️💞Archu💞
(अनंत राऊत यांची ही गझल खूप आवडली मला... म्हणून मी लिहिली..)
-Archana Rahul Mate Patil