Marathi Quote in Funny by Archana Rahul Mate Patil

Funny quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

आडगाव माझं माहेर ..जयपूर माझे सासर..गावात घर..घरासमोर अंगण ..अंगणात मोठे प्रांगण ..प्रांगणात तुळशीचे वृंदावन..वृंदावना समोर रांगोळी..नाव घेते हळदी च्या वेळी..नाव घ्या, नाव घ्या,नावात काय असतं..नावात असतं..लहानांचा मोठेपण,मोठ्यांचा थोरपण,थोरांचा मान,तोच आमचा स्वाभिमान ,भरजरी शालू ,ठसठसशीत चांदण्या..नाव घेते ठोंबरे पाटलांची कन्या..चंद्रकोर नथ,मोत्यांची डोरले ,काचेच्या हिरव्या बांगड्या हातात..चांदीची जोडवे पायात. ..ही आहे सौभाग्याची खून..उखाणा घेते मते पाटलांची सून...आज आहे लग्न .लग्नाचा मंडप..मंडपात पंगत..पंक्तीत अत्रावळ,अत्रावळीवर पत्रावळ,पत्रावळीवर भात ,भातात वरण ,वरणात तूप ..तूपासारखं रूप,रुपयासारखा जोडा,राहुल पाटलांचा नी माझा,अखंड राहो सौभाग्य जोडा..✍️✍️💞 Archu💞आत्ता लग्नसराईत चालू झाली तर उखाण्याची काही औरत गंमत असते नाही का.. उखाणे घ्यायचं म्हटलं की गालावर हसू येतं, नी नाव घ्यायला लाजही वाटते.. पण सगळ्यांच्याच आग्रहाखातर उखाणा हा घ्यावाच लागतो.. तशी आपली परंपराच आहे.. उखाणे लाच आईना असेही म्हणतात... जुन्या म्हाताऱ्या बाया अगदी लांबलचक ओवीबद्ध असा उखाणा घेतात.. आता त्यांच्यासारखा उखाणा घ्यायला कुठे जमतो... म्हणून आता शॉर्टकट पाच ते दहा शब्दांचा उखाणा घेतात.. पण आमच्या इकडे गावी मात्र सगळ्याच बायका अगदी तोंड भरून अप्रतिम असा उखाणा घेतात.. नेहमी नेहमीच कार्यक्रम असल्यामुळे उखाणे ही वेगवेगळे घेतात.. प्रत्येकाची उखाणे घेण्याची पद्धत ही वेगळी जरी असली तरीही ऐकायला खूपच भारी वाटतो... प्रत्येकामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण असाही असतात आसाम प्रसंगाला त्या प्रसंगाला अनुरूप असा उखाणा घेतला जातो.. हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला म्हणा किंवा लग्नविधी च्या वेळेस अनेक वेळा हा उखाणा घ्यावा लागतो.. जेव्हा सर्वप्रथम नवरी ही गृहप्रवेश करत असते त्या वेळी नवरदेवाच्या बहीणी दार उघडून तिला उखाणा घेण्यास सांगतात तेव्हापासूनच ती उखाणा घ्यायला सुरवात करत असते.. लाजेची लाली घेऊन नाव घ्यायला आणि ऐकायला ही खूप छान वाटते बरं का... मला तर नाव ऐकायला आणि मोठमोठ्या उखाणे मध्ये घ्यायलाही आवडतं.. तुम्ही उखाणे घेता का???.मी एक उखाणा तिथे टाकला आहे तो खूप जुना असला तरी मला तेवढाच एक मोठा येतो बाकी छोट्या छोट्या शब्दांमध्ये रचना करता येते.. पण तितका सहज जमत नाही.. हा उखाणा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा..!!तुमचीच ✍️✍️💞Archu💞

-Archana Rahul Mate Patil

Marathi Funny by Archana Rahul Mate Patil : 111665963
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now