फोन वाजला
एकदा ,दोनदा ,तीनदा.......
मी पाहिलं आणि इग्नोर केलं,
पुन्हा एकदा फोन वाजला,मी काचेतून समोर पाहिलं तोच होता,हातवारे करत विचारात होता फोन का उचलत नाहीस?
मी समोरून फोन केला.
"Hmmmm! बोल काय बोलतोस?
" काय बधीर आहेस का ? कधी पासून कॉल करतोय?
चल निघू या! "
" नाही ,मला थोड काम आहे,तू हो पुढे"
" किती वेळ लागेल?"
"एक तास"
"ठीक आहे . मी वेट करतो"
"नको,निघ ना तू"
"मी वेट करतोय! And that is final ,you complete your work then we'll move,Ok."
"Hmmmm"
मी फोन ठेवला,
हा असाच आहे .
घना ,नावाप्रमाणे सावळा आणि गोड. घनदाट काळे केस, तरतरीत चेहरा आणि कोणाचाही पत्ता कट करेल अशी कातील smile.
" झालं का?"
मी एकदम भानावर आले
"हो"
" मग निघू या"
" Hmmm"
जरा आरशात पाहिलं,थोडा चेहरा ठीक ठाक केला .
"चल लवकर दहा वीस पकडायची आहे"
हा असा का वागतो.त्या दिवशीच त्यानं संपवलं सगळ.तरीही त्याला माझ्याशी बोलायचं आहे.सरळ म्हणाला तू लहान आहेस .
मला ऑफिस जॉईन करून दोनच महिने झाले होते.तशी मी भिडस्त,खूप कमी बोलणारी.हा दिसायचा समोर बराच वेळा.smile करायचा कधी बोलण्याचा प्रयत्न करायचा.मी बराच वेळा इग्नोर केलं .याला कारण होत एक तर मी दिसायला girl next door होते आणि एवढ हायफाय कल्चर मधून ही आले नव्हते. पण मला दिसायचं याला बोलायचं माझ्याशी.
कधी खुर्ची गोल फिरवून जायचा,आणि मी मागे वळून पाहिलं की तो ही मागे वळुन गोड हसायचा. कधी चहा प्यायला ,कधी ऑफिस meeting मध्ये नेहमी माझ्या आजूबाजूला असायचा.
आणि एकदा ती वेळ आली. मी ट्रेन ची वाट पहात होते,समोरून येणारी ट्रेन मी पकडणार तर हा समोर.
"तू इथे राहतेस"
"हो"
"म्हणजे तू माझ्या एक्झॅक्टली एक स्टेशन पुढे राहतेस"
"हो"
"तुला माहित होत"
"हो"
" बधीर मग मला तू कधी सांगितलंस नाही"
"Hmmm"
"आता रोज सोबत यायचं आणि सोबत घरी जायचं"
नेहमी हाच सगळ ठरवायचा.समोरच्याला काय वाटतं याच त्याला काहीच नसायच. समोरच्या वर असा आपुलकीने हक्क गाजवयाचा की समोरचा नाही म्हणणार नाही.
मला कळत होत मी गुंतत चालले आहे आणि एक दिवस असा आला की मी ठरवलं याला सांगून टाकायचं सगळ.
शनिवार होता सुट्टीचा दिवस,पण काही प्रोजेक्ट अर्जंट होते म्हणून मी ऑफिसला आले होते. एन मिन चार लोक होते .हा पण होता.
"आज जरा बोलायचं होत मला"
त्यानं डोक्यात एक टपली मारली.खुर्ची त्याच्याकडे वळवली आणि माझ्या डोळ्यात पहात म्हणाला ,
"बोल"
"तू आवडतोस मला,नाही .......
म्हणजे माझ तुझ्यावर प्रेम आहे.........."
मला शब्द बोलता येत नव्हते. त्यानं माझ्याकडे पाहिलं.
आणि तो खूप हसायला लागलं.अचानक थांबला,माझ्या केसातुन हात फिरवून हसत म्हणाला ,
" तू लहान आहेस अजून.वेडे हे प्रेम वगैरे काही नाही"
"तू बधीर आहेस......
हसतच होता ,खूप वेळ.
क्रमशः...