Marathi Quote in Poem by Khushi Dhoke..️️️

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

आला - आला सण हा दिवाळी
सगळे शुभकार्य पार पडतात या सणावेळी...

जर पेटतेच दारोदारी रोषणाईची वात
तर, मग का असावी त्या रोषणाईला कसलीच जात...?

चला करूया प्रण या दिवाळी सर्व - समभाव
मिटवून टाकुया समाजातील माणुसकीचा अभाव...

नसेल मनात कुणाहीविषयी नकारात्मकता 
प्रत्येकाच्या जमण्याने येईल सकारात्मकता...

ध्वनी प्रदूषणास नष्ट करण्याचा घेऊ प्रण
त्यासाठी म्हणावे लागेल, 'फोडणार नाही फटाके एकही जण'...

गोर - गरीब, गरजूंना करू मदत मनातून
घेऊ पवित्रा येईल हीच मदत प्रत्येक जणातून...

वाटू सर्वांना संदेश, दिवाळी उत्साहात साजरी करण्याचा
मिटवू सामाजिक दुरावा, जो आलाय या महामारीचा...

लक्ष्मी पुजूनी करतो आपण दिवाळी उत्साहात साजरी
मग होईल ना, या तरी दिवाळीत घरची लक्ष्मी सर्वांना प्यारी...?

माता लक्ष्मी एक स्त्री असूनही पुजता जिला
मग का आडवी येते नैसर्गिक प्रक्रिया (मासिक पाळी) एका सामान्य स्त्रीला...?

नैसर्गिक प्रक्रिया नसते हो दूषित 'ती' ची
फक्त हा समज दाखवतो कुबुद्धि ज्याची - त्याची...

नसेल कुठलेच बंधन एका स्त्रीवर या दिवाळी
घेऊन हा प्रण करू दिवाळी साजरी या वर्षी आगळी - वेगळी...

Marathi Poem by Khushi Dhoke..️️️ : 111602888
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now