रित्या पहाटेच्या ओठी
कुण्या पाखरांच्या ओळी
वारा घालू दे स्वप्नांना
पापण्यांची कर झोळी
दुपार कुशीवर वळता
आठवांचं पाणी होतं
वेड्या उन्हांचं बघ
काळीज करपून जातं
सांजवातीच्या पर्वाला
मिणमिणला एक दिवा
थंड शांत उजेड
काजळीला उगा हेवा
रात्र ओंजळीत घेता
खाली अंधार सांडतो
मी खुडली चांदणी
चांद माझ्याशी भांडतो
-Harshada