तिचे तिलाच कळले नाही,
का बावरून गेली
मी फक्त हसलो जरासा ,
ती उगाच मोहरून गेली
भेटलो काल सहजच,
ती चांदनवेळ होती
चल निघते निघते म्हणता
रात्र ओसरून गेली
ती आली तेव्हा अशी
दवांत न्हाऊन आली
अन जातांना हलकेच
चांदणे पांघरूण गेली
राहिलो न मी माझा
कसा कुणास ठाऊक
ती कुठूनशी आली अन आयुष्य मंतरुन गेली...!
-Harshada