मनातले शब्द कागदावर उतरायला लागले
कळत - नकळत मन खुलायला लागले...
कोण न जाणे का? मन स्वतःशीच बोलायला लागले
कधी नको ते आज आनंदी दिसायला लागले...
सगे - सोयरे दूर जायला लागले
कारण, त्यांना माझे वागणे बोचायला लागले...
हृदयात जे होते, मन सांगायला लागले
डोक्यातील नको ते विचार, नाहीसे व्हायला लागले...
शत्रूंचे प्लॅन विस्कटायला लागले
कारण, माझ्या जगण्याला पंख फुटायला लागले...
🤗 खुशी ढोके 🤗