मुस्कुराइए आप गलत जगह पर है..👍 आपल्या जिवंतपणाची किंमत जाणून घेण्यासाठी. तुला मरावं लागेल रे, तुझ्या गोष्टींना तेव्हा किंमत येईल बघ... सध्या तेच चाललंय... तू जिवंतपणी कितीही ओरड, कितीही समजून सांगण्याच्या प्रयत्न कर. तुला ते टाळतीलच, मग तेवढ्याच जोशाने त्यांच्या डोळ्यांतून, तू गेल्यावर पाणी दिसेल वाहताना, तुला नाही, इतरांना...बरं! जगाची रीत झालीये, असताना किंमत केल्यापेक्षा गमावल्यावर किंमत करण्यात त्यांना जास्त आनंद वाटतो. मेल्यावर उदो उदो करण्यात त्यांना खूप भावनिक वाटतं, मग, मग एखाद्या साध्या गोष्टीसाठी झुरावं माणसानं,
माणसानेच तयार केलेय ह्या जगात माणसालाच हव्याश्या गोष्टी मिळू नये एवढं कठीण होऊन बसतं का सगळं.. कठीण काहीच नाही अस म्हणता सगळे मग प्रयत्न करूनही का काही गोष्टी हाती लागत नाही माणसाच्या.. का त्या मिळवताना माणसंच आड येतात. का एवढं कठीण करून ठेवलंय सगळं.
समोरच्याला दुखावून काय मिळवायचं असतं ह्यांना. कुणास ठाऊक, त्यांना त्यांचा स्वार्थ पूर्ण करायचा असतो बस्स, मग समोरचा मरो का राहो, काय करायचंय, मनातल्या मनात तर कुठे हळू आवाजात बरा मेला, त्याच्या कर्मानं गेला अस म्हणत आपल्यावरचं पाप धुवून टाकायचं.. मग इतर लोक आहेतच आपली चूक लपवण्यासाठी खूप चांगला होता, करता हिता सगळं ऐकायचा होता चांगला कमवता होता अशी थोतांड मारून आपल्याला तो गेल्याच किती दुःख आहे हे पटवून द्यायचं लोकांना, पण खर कोण सांगेल की हेच मारेकरी आहेत म्हणून... ज्याला माहिती त्याने तर केव्हा रजा घेतलीये चितेला आग लागल्यावर
शेवटचा राम राम ठोकून सगळे निवांत व्हा.. काही दिवस गुणगान गा, त्याच ऐकलं असतं, त्याच्या मनासारखं करून दिल असतं, तर काही फरक पडला असता का ह्याचा आता विचार करा.... आणि त्या विचारांची राख करा...