Marathi Quote in Motivational by Dnyanraj Panchal

Motivational quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांवरुन सार्‍या लोकांनी मिळून एकच सूर लावला की , माणूसकी संपली आहे . घडणार्‍या घटना अमानवीय असल्या तरिही ; संपुर्णपणे ह्या जगातून मानवता संपलीच आहे असा ग्रह करुन घेण्यात काही अर्थ नाही . प्रेमाची , विश्वासाची अपेक्षा जशी आपण केवळ जगाकडून करतो , तसचं माणुसकीची अपेक्षाही केवळ जगाकडून करत आलोत . जगात प्रेम आहे का ? असं कोणी विचारेल तेव्हा , आपण ठामपणे म्हणतो का कधी की , हो आहे ! किमान मी आहे तोपर्यंत तरी प्रेम माझ्या रुपाने शिल्लक आहे . असं म्हटलय आपण कधी ठामपणे ? .
.
मला अजूनही दिसतात अवतीभोवती अडचणीत असणार्‍या माणसांना मदत करणारी माणसं . मुक्या जिवांना जिवापाड जपणारी माणसं . पुरात , भुकंपात आणि महामारीत अडकलेल्यांना त्यातून बाहेर काढणारी माणसं . मदतीची हाक दिल्यानंतर त्याला लागलीच प्रतिसाद देणारी माणसं . आजही जातं ह्या घरात बनलेलं जेवन शेजारच्या घरात सहजपणे . आणि त्या घरातीलही येतं आपल्या घरात . प्रेमाची देवाणघेवाण आजही होते . तसं पाहीलं तर , जगाच्या पाठीवर झालेली महायुद्ध , त्यातील संहार , वा माणूस माणसावर करत आलेला अत्याच्यार ह्या सार्‍या गोष्टींविरुद्ध उभी राहणारीही माणसंच आहेत . अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारीही माणसंच आहेत . आहेत जगात अजूनही भुकेल्या लोकांची काळजी वाहणारी माणसं . आहेत अजूनही अनाथांना आधार देणारी माणसं . ज्यांच्या रुपाने मुर्तिमंत माणुसकी वावरत असते . फरक इतकाच की , आपल्याला दिसत नाहीत अशी माणसं ह्या जगाच्या झगमगाटीत !
.
.
माणुसकी जपणार्‍यांच होत नाही कौतुक आपल्याकडे हवं तितकं . ती प्रसिद्ध नसतात . प्रसिद्धी कौतुक येतं केवळ त्यांच्या वाट्याला जी दिखावा करतात माणुसकीचा . फोटो , व्हिडीयो व्हायरल होतात . तितक्यापुरतं कौतुक होतं आणि लोकं विसरुन जातात . माणुसकी जपणार्‍यांच तात्पुरतं कौतूक करुन आपण मोकळे होतोत . आपल्या नजरेतून त्याचं तोलमोल करुन आपण बसतोत आपल्याच घराच्या आत . पण ; देणार्‍याने देत जावे । घेणार्‍याने घेत जावे । घेता घेता घेणार्‍याने । देणार्‍याचे हात घ्यावे ॥ हे विसरुन जातोत . माणुसकी जपणार्‍यांपासून आपण त्यांची वृत्ती कधी घेत नाहीत . म्हणून वाटत राहतं आपल्याला की , संपलीये माणूसकी !
.
.
कोणी म्हणो वा ना म्हणो ; मी तरी म्हणेल की , माझ्या शेवटच्या श्वासांपर्यंत मी ठेवेल माझ्या आत माणुसकी जिवंत !दिव्याने अंधार झालाय म्हणून अोरडण्यात अर्थ नसतो . आपण जिवंत असताना माणूसकी संपली असं म्हणण्यात तरी कोणता अर्थ आहे ?
.
.
विश्वाकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा काही गोष्टी आपण जपायच्या असतात .
.
©मुक्तज्ञानी (insta/@panchal_dnyanraj)

Marathi Motivational by Dnyanraj Panchal : 111468334
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now