मावळता सुर्य पाहुनी ,रात्रीची चाहुल लागली
भटकंती करून पाखरे घरट्यात जाऊ लागली
निळं ते आकाश,लाल होत होतं
मन पटली माझ्या नक्षी कोरत होतं.
झाडाचं झुलण आता बंद झालं, पाहुन ते मन माझं धुंद झालं
हळूहळू चंद्र डोकावत होता
घेऊन चांदण्यांना मिरवत होता
चंदेरी प्रकशानं आकाश व्यापलं होतं
भाग्यवान डोळ्यांनी दृश्य ते टिपलं होतं
थंड थंड वारा सुटायला लागला
अंगावर माझ्या बागडायला लागला
फिरवून हात भाळी माझ्या
मलाच वेड्यात काढाया लागला
शांत ती निशा ,काळी चादर ओढू लागली
हरवलेली साखर झोपेत ते, पहाट पुन्हा शोधू लागली