#####good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
##पक्ष_मराठी विभाग.
सावध होऊनी घरी बैसुनी भजन करी ।
नाममंत्र उच्चारी कोरोना_#पक्ष पळवा दुरि ।
🙏रामकृष्णहरि🚩🚩 ॥ श्री विठ्ठल श्री तुकोबाराय ॥
उभा उभी फळ । अंगीं मंत्राचिया बळ ॥ १ ॥
म्हणा विठ्ठल विठ्ठल । गोड आणि स्वल्प बोल ॥ धृ ॥
कळिकाळाची बाधा । नव्हे उच्चारितां सदा ॥ ३ ॥
तुका म्हणे रोग । वारे भवाऐसा भोग ॥ ४ ॥
~~०~~
भावार्थ :—
१. या विठ्ठल मंत्राच्या अंगीं इतके सामर्थ्य आहे की, त्या योगाने कोणतेही फळ तत्काळ मिळते.
२. याकरिता 'विठ्ठल विठ्ठल' असे म्हणा. हा मंत्र अतिशय गोड आणि सोपा आहे.
३. या विठ्ठलमंत्राचे अखंड उच्चारण केले, तर कळिकाळाची बाधा होत नाहीं.
४. तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलमंत्राने अज्ञानासारखे व जन्ममरणासारखे रोग जातात. तर मग इतरही असाध्य रोगांचे उच्चाटन होईल, हे काय सांगावयास पाहिजे? *जगद्गुरु तुकोबाराय* *विठ्ठल-रखुमाई💐विठोबा-रखुमाई🙏रामकृष्णहरि👏🏻जयजय-मुक्ताई⛳*