।। श्री रामकृष्ण परमहंस - महान कालीमाता भक्त ।।
---------------------------------------------------------------
🌸 *कालीमातेचे महान उपासक रामकृष्ण परमहंस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !* 🌸
लहानपणापासून रामकृष्ण परमहंस यांना शालेय शिक्षणात त्यांना विशेष रुची नव्हती. शाळेत शिकण्याचा विषय काढला, तर गदाधरांनी (रामकृष्ण परमहंस) म्हटले, ‘मला भातभाकरीची विद्या नको, ईश्वरदर्शन होईल अशी विद्या हवी’. देवपूजा, भजन, सत्संग यांची आवड होती. तरुण वयात दक्षिणेश्वर येथे राहून त्यांनी कालीमातेची उपासना केली. त्यांचे गुरु तोतापुरी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून गदाधर ‘परमहंस’ पदाला प्राप्त झाले. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही आपल्या हृदयात असल्याचे ते सांगत. सहस्रो जणांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. त्यातील काही पाश्चिमात्त्य देशांतीलही होते. त्यांच्या कार्याची धुरा स्वामी विवेकानंद यांनी समर्थपणे पेलली.
*अधिक माहितीसाठी भेट द्या :* https://www.sanatan.org/mr/a/25037.html
*सनातन संस्थेच्या विश्वकल्याणकारी धर्मकार्यात यथाशक्ती सहभागी व्हा :* Sanatan.org/sampark
👇🏻