शारदेच्या पायातले नुपूर घरंगळतात
नटराजच्या तांडवात ताल सूर रेंगाळतात
अशी ही थोर योग्यांची कर्मभूमी
आपली मराठी रंगभूमी!
भाषेची नादमयता
शब्दांची भावात्मकता
भावनेची प्रांजळता
आपली मराठी रंगभूमी!
गंधर्वांचे वैभव
गुणिजनांचे लाघव
रसिक श्रोत्यांचा घेते ठाव
मराठी रंगभूमी!
हिची नांदी रंगते
मध्यंतर आसुसते
भरतवाक्य डोळा साठविते
मराठी रंगभूमी!